आगरदांडा : मुरूड हे पर्यटनस्थळ असून येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटकांच्या सुरक्षेबरोबरच वाहतूक नियमांची अंमलबजावणी व्हावी म्हणून मुरूड पोलिसांकडून मद्यपी चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. ३१ डिसेंबर व जानेवारी महिन्यातील गर्दी पाहून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.मुरूड पोलिसांकडून नगरपरिषद जकात नाका, बाजारपेठ व समुद्रकिनारा आदी ठिकाणी तपासणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ब्रेथ अॅनालायझरमशीनद्वारे पर्यटकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १६ जणांवर कारवाई करण्यात आली. सर्वांना प्रत्येकी मुरूड दिवाणी न्यायालयात २,५०० रुपयांचा दंड आकारण्यात आलाजिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्य्क पोलीस निरीक्षक किशोर साळे व पोलीस उपनिरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल अहिरे यांनी ही कामगिरी बजावली.
मद्यपी चालकांवर मुरूडमध्ये कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 23:41 IST