मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, ट्रॅव्हलर बसची ट्रेलरला धडक; चालकासह १४ प्रवासी जखमी

By राजेश भोस्तेकर | Published: September 8, 2022 08:12 AM2022-09-08T08:12:03+5:302022-09-08T08:12:03+5:30

मुंबई गोवा महामार्गावर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर बसने ट्रेलरला धडक दिली.

Accident on Mumbai Goa highway traveler bus collides with trailer 14 passengers including driver injured | मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, ट्रॅव्हलर बसची ट्रेलरला धडक; चालकासह १४ प्रवासी जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, ट्रॅव्हलर बसची ट्रेलरला धडक; चालकासह १४ प्रवासी जखमी

Next

अलिबाग :

मुंबई गोवा महामार्गावर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर बसने ट्रेलरला धडक दिली. या अपघातात चालकासह 14 प्रवासी जखमी झाले. यात 7 महिलांचा समावेश आहे. अपघात ग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांनी तातडीने जखमींना पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले  अपघातग्रस्त बस 22 प्रवासी घेवून रत्नागिरीतील खेड येथून मुंबईकडे निघाली होती. पेण जवळील हमरापूर फाटा इथं पुलावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या कॉईल वाहक ट्रेलरला बसने मागून धडक दिली. अपघातात बसच्या पुढील भागाचे नुकसान झालंय.

गणेशोत्सव साजरा करून चाकरमानी हे मुंबईकडे येऊ लागले आहेत. अपघातग्रस्त वाहन ही कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करत होते. टेम्पो ट्रॅव्हलर (एम एच ४३ बीपी ०७५६ ) खेडवरून मुंबई सांताक्रूझकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती. पेण हमरापूर पुलावर ट्रॅव्हल्स आली असता बंद पडलेल्या कॉईल ट्रेलर (एम एच ४६ एआर ००७४) ला मागून धडक दिल्याने अपघात घडला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. गणेशोत्सव काळात महामार्गावर वाहनाची संख्या वाढली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडत आहेत. वेगाची मर्यादा चालक पाळत  नसल्याने अपघाताला कारण ठरत आहे. 

जखमींची नावे 
चालक सागर दिलीप गुरव वय ३१
प्रतिभा महेश देवळे वय ३०
रंजना दीपक भुवड वय २५
मीनल काशिनाथ देवळे वय २५
काशिनाथ पांडुरंग देवळे वय ५०
सुरेश सखाराम नाचरे वय ४०
प्रवीण काशिनाथ नाचरे वय ३४
मंगेश मधुकर देवळे वय ४१
स्वप्निला काशिनाथ देवळे वय ४७
संजना संजय पाटील वय ३४
समृद्धी संजय पाटील वय १४
दीपक गंगाराम भुवड वय ३०
श्वेता सुनील भुवड वय ३५
संजना सुरेश नाचरे वय ३५

Web Title: Accident on Mumbai Goa highway traveler bus collides with trailer 14 passengers including driver injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात