शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; २४ प्रवासी जखमी, डंपरच्या धडकेत एसटीचा चक्काचूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 06:31 IST

नियंत्रण सुटल्याने घडली घटना

महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरानजीक नाते खिंडीजवळ डंपर व एसटीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यात एसटीच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

अपघातात एसटीचालक, डंपरचालक आणि अन्य २२ प्रवासी असे एकूण २४ प्रवासी जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. दरम्यान, इतकी भीषण धडक होऊनही दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. त्यामुळे काळ आला होता, पण वेळ नाही अशीच स्थिती महामार्गावर होती.

मुंबई एसटी डेपोमधून सकाळी ४:४५ वाजता सुटणारी मुंबई-महाबळेश्वर बस महाड शहरानजीक नाते खिंड या ठिकाणी सकाळी ९:४५ वाजता आली. याच सुमारास मुंबई दिशेला जाणारा एक भरधाव डंपर बसवर येऊन आदळला. एसटीत एकूण ४० प्रवासी होते. सर्व जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात आणि एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.  दरम्यान, मुंबई- गोवा महामार्गावरची अपघातांची मालिका थांबता थांबत नसल्याचेच चित्र आहे.

अपघातात जखमी झालेल्या त्या २४ प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे

या अपघातामध्ये एसटीचालक सिद्धार्थ राजेंद्र जंगम (३१, रा. बांधन अलिबाग), उमेश दत्तात्रय शिंगटे (३५, रा. सळवल, सातारा), अजित बाळ पाटील (५१, रा. पेण), विमल महेश शिगवण (४० रा. तळेगाव माणगाव), कलंदर जरुद्दीन कुवारे (३८ रा. नागोठणे), शांती दगडू भोसले (७०, रा. देवळी माणगाव), उमेश बळीराम खैर (४२, रा. कोलाड), सुनील सुदाम रसाळ (५१, रा. सापे महाड), नमिता गोविंद वाघमारे (६० रा. तळेगाव माणगाव), कविता नरेश मानंद (३८ रा. देवळी माणगाव), सविता आदेश भोसले (३१, रा. देवळी माणगाव), लतिका लक्ष्मण शिंदे (४५, रा.छत्री निजामपूर महाड), अलमास असीम कुवारे  (३६, रा. नागोठणे), अफोज अजीज कुवारे (३६, रा. नागोठणे), अब्दुल रहेमान आसिफ कुवारे (७, रा. नागोठणे), सविता सखाराम शिर्के (५०, रा. चिंचवली माणगाव), महमद शहा अब्दुल अजीज कुवारे (१०, रा. नागोठणे), मरियम अब्दुल अजीज कुवारे (१२, रा. नागोठणे), फातिमा आसिफ कुवारे (३, रा. नागोठणे), भारती लक्ष्मण हिरवे (१७, रा. रानसई, पेण), दीपाली लक्ष्मण हिरवे (२०, रा. रानसई), शर्वरी अनंत कासार (२०, रा. गोरेगाव, मुंबई), आप्पा पोपट चव्हाण (३४, रा. बरड, सातारा) असे २४ प्रवासी जखमी झाले.

अपघाताचे वृत्त कळताच महामार्ग वाहतूक शाखा पोलिस महाड आणि महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने  मदतकार्य सुरू केले.  क्रेनच्या साह्याने दोन्ही वाहने बाजूला करून महामार्गाची वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद महाड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :Accidentअपघात