शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कार्ले खिंडीत अपघात; आयवा पलटी होऊन खडी, ऑईल रस्त्यावर

By राजेश भोस्तेकर | Updated: April 23, 2023 13:21 IST

अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: अलिबाग वडखळ मार्गावर कार्लेखिंड येथे आयवा ट्रक वाहनाला अपघात झाला आहे. या अपघातामुळे वाहनातील खडी रस्त्यावर पसरली असून ऑईल रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे वडखळ कडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस रस्ता सुरळीत करीत आहेत. मात्र या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

अलिबाग वडखळ मार्गावरून खडी घेऊन  टाटा कंपनीचा आयवा ट्रक (एम एच ०६/बी डबल्यू ७९९२ ) हा अलिबाग कडे येत होता. कार्ले खिंड चढताना ट्रकला अपघात होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाला. त्यामुळे वाहनातील खडी रस्त्यावर पसरली. वाहन पलटी झाल्याने वाहनातील ऑईल रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे इतर वाहनांना अपघाताची शक्यता असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली होती. अलिबाग येथून रेवस मार्गावरून कनकेश्वर फाटा द्वारे कार्ले खिंड अशी वाहतूक वळविण्यात आली होती.

अपघातानंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेली खडी स्थानिकांच्या मदतीने बाजूला करून ऑईल वर माती टाकून रस्त्या वाहतुकीस सुरळीत केला. मात्र या अपघातामुळे काही काळ अलिबाग वडखळ रस्त्यावरील विस्कळीत झाली होती.

टॅग्स :alibaugअलिबागAccidentअपघात