शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

उधाणामुळे बंधाऱ्यास ११ ठिकाणी भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:40 IST

धेरंड-शहापूर गावांतील २५० शेतक-यांना फटका; एक हजार हेक्टर भातशेतीत घुसले पाणी; पाच दिवस झाले तरी शासनाचा नाही पत्ता

-जयंत धुळपअलिबाग : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस आलेल्या उधाण भरतीमुळे तालुक्यातील खारेपाट विभागातील धेरंड आणि शहापूर या गावांच्या पूर्वेस असलेल्या धरमतर खाडीच्या समुद्र संरक्षक बंधाºयास तब्बल ११ ठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. उधाणाचे पाणी दोन्ही गावांतील एक हजार हेक्टरपेक्षा जास्त भातशेतीत घुसल्याने सुमारे २५० शेतकºयांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शहापूरचे आपद्ग्रस्त शेतकरी अमरनाथ पाटील यांनी दिली आहे.भातशेतीत येणारे पाणी थांबविणे, भविष्यात उधाणाचे पाणी शहापूर व धेरंड गावांतील मानवी वस्तीत घुसू नये, यासाठी संरक्षक बंधाºयाची ११ ठिकाणी पडलेली भगदाडे सामूहिक श्रमदानाने बुजवण्याकरिता गेल्या पाच दिवसांपासून ग्रामस्थांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.हवामान खात्याने १३ ते १७ जुलै दरम्यान उधाणाच्या मोठ्या लाटांचा इशारा दिला होता. त्याआधी दोन वेळा संरक्षक बंधाराफुटीमुळे उधाणाचे पाणी गावातील घरांत पोहोचले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही गावांतील ग्रामस्थ दिवस-रात्र पाळत लावून संरक्षक बंधाºयांवर नजर ठेवून होते. १५ जुलैला उधाणाच्या भरतीमुळे बंधाºयास ११ ठिकाणी भगदाडे पडली.ग्रामस्थांमध्ये संतापगेल्या पाच दिवसांपासून दररोज किमान १०० ग्रामस्थ बंधाºयाची भगदाडे बुजवण्याकरिता श्रमदान करत आहेत. नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्याकरिता सतर्क असल्याचा दावा करणाºया रायगड जिल्हा प्रशासन वा जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा यांना जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १५ ते २० कि.मी. अंतरावर आलेल्या या नैसर्गिक आपत्तीची कोणतीही कल्पना नाही. सरकारच्या तलाठ्यापासून कोणीही कर्मचारी वा अधिकारी गावांत फिरकलेला नाही, त्यामुळे नुकसानभरपाईसाठीचे पंचनामे करण्याची कामदेखील गावांत सुरू झाली नसल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नंदन पाटील यांनी दिली आहे.‘एमआयडीसी’ची बेफिकिरीमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)ने शहापूर व धेरंडमधील शेतकºयांच्या जमिनी टाटा पॉवर प्रकल्पासाठी संपादित केल्या आहेत. या जमिनी आणि धरमतर खाडी यामधील समुद्र संरक्षक बंधारे यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. त्यामुळे खारभूमी विकास विभाग या संरक्षक बंधाºयाची देखभाल व दुरुस्ती करत नाही आणि गेल्या काही वर्षांत एमआयडीसीने आपली जबाबदारी निभावलेली नसल्याने सातत्याने संरक्षक बंधारे फुटून भातशेतीचे नुकसान होत असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबाग