शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वळवलीमध्ये पाण्याची नवीन टाकी बांधणार; पंधरा दिवसांत कामाची निविदा काढणार

By निखिल म्हात्रे | Updated: January 11, 2024 14:20 IST

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग : वळवली गावात जल जीवन योजनेचे काम सुरू होते. मात्र, ठेकेदाराने जुन्याच टाकीला रंगरंगोटी करून ...

लोकमत न्युज नेटवर्कअलिबाग : वळवली गावात जल जीवन योजनेचे काम सुरू होते. मात्र, ठेकेदाराने जुन्याच टाकीला रंगरंगोटी करून योजना मार्गी लावण्याचा घाट घातला होता. त्यामुळे येथील महिलांनी आक्रमक भूमिका घेत त्याला विरोध केला. नवीन टाकी बांधण्यात यावी, अशी मागणी केली होती. याची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली असून, लवकरच नवीन पाण्याच्या टाकीची कामाची निविदा काढली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बेलोशी ग्रामपंचायत हद्दीतील वळवली येथे २३० घरांची वस्ती आहे. या गावाची लोकसंख्या ९०० हून अधिक आहे. आदिवासीवाडीत २० वर्षे जुन्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांद्वारे उमटे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. गावातील जुन्या टाक्या जीर्ण झाल्याने त्यांची वारंवार डागडुजी करावी लागत आहे. गावासाठी सुमारे ९७ लाख रुपयांची जल जीवन योजना मंजूर झाली आहे. या योजनेमार्फत गावातील नागरिकांना मिळणारे पाणी जुन्या टाकीद्वारेच दिले जाणार आहे. या टाक्या नादुरुस्त होण्याचा धोका कायमच संभवत आहे.

जीर्ण झालेल्या टाकीच्या जागी नवीन टाकी बांधण्यात यावी, अशी मागणी वळवली येथील महिलांनी केली. याबाबत १९ डिसेंबरला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची भेट घेतली होती. महिलांच्या या मागणीची दखल घेत प्रशासन तातडीने कामाला लागले.

प्रत्यक्ष भेट देत केली पाहणीपाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता निहाल चवरकर यांनी प्रत्यक्ष वळवली गावात जाऊन तेथील महिलांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली. येत्या पंधरा दिवसांत नवीन टाकीसाठी कामाची निविदा काढली जाणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार जल जीवन मिशन योजनेसाठी नवीन टाकी बांधली जाणार असल्याने महिलावर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.वळवली येथील महिलांच्या मागणीनुसार, पाण्याच्या टाकीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. सीएसआर फंडातून ही टाकी बांधली जाणार आहे. पंधरा दिवसांत त्याची वर्क ऑर्डर निघेल.- निहाल चवरकर, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, अलिबाग पंचायत समिती

टॅग्स :Waterपाणी