शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

मुरुडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९७ अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:52 IST

ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०१७ करिता वावडुंगी, वेळास्ते, तेलवडे, कोर्लेई, काकळघर या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ९९ अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी मुरुड, दरबार हॉल येथे करण्यात आली.

आगरदांडा : ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०१७ करिता वावडुंगी, वेळास्ते, तेलवडे, कोर्लेई, काकळघर या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ९९ अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी मुरुड, दरबार हॉल येथे करण्यात आली.वावडुंगी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाकरिता आठ तर सरपंचपदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते.त्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष वाणी यांनी केली. सरपंचपदाचे उमेदवार हरिश्चंद्र भेकरे यांनी दुसरे सरपंच पदाचे उमेदवार दशरथ वाजे यांच्याविरोधात लेखी तक्र ार केली. दशरथ वाजे यांचे मुरु ड नगरपरिषद वॉर्ड क्र मांक ७ या ठिकाणी त्यांचे नाव आहे. त्यासंदर्भात लेखी तक्र ार दाखल करण्यात आली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकाºयांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १३ नुसार जर एखाद्या व्यक्तीचे नाव मतदारांच्या यादीत असल्याने तो अर्ज वैध ठरविण्यात येतो असे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष वाणी यांनी तक्र ारदारांना सांगितले. सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यावेळी सर्व उमेदवार सदस्य व सरपंच सदस्य हजर होते.वेळास्ते ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४ सरपंचपदासाठी तर १५ सदस्यपदासाठी अर्ज दाखल झाले होते.त्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी नारायण गोसावी यांनी केली असता त्यावेळी सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले. त्याप्रसंगी सर्व सदस्य व सरपंच उमेदवार उपस्थित होते. तेलवडे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी ४ तर सदस्यपदासाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश खिलारे यांनी केली असता ते सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. कोर्लेई ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७ सरपंचपदासाठी तर ३६ सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश वारगे यांनी केली असता सरपंच पदाकरिता आलेले सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. तसेच सदस्यपदासाठी प्रभाग ३ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग यामधून अलका पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. बाकी सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहे.काकळघर ग्रामपंचायत सरपंचपदासाठी ४ तर २६ सदस्यपदासाठी अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी किशोर माळी यांनी केली. सदस्यपदाकरिता प्रभाग ३ मधून सर्वसाधारण स्त्रियांमधून राखी भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु तो अर्ज आॅनलाइन करताना बी.सी.सी.राखीव जागेकरिता भरल्यामुळे तो अर्ज अवैध ठरविण्यात आला. बाकी सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. यावेळी तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार दिलीप यादव उपस्थित होते.महाडमध्ये पाच उमेदवारांचे अर्ज बादमहाड : तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्यपदासाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी पाच उमेदवारी अर्ज मंगळवारी छाननीत बाद झाले. सदस्यपदासाठीचे चार तर सरपंचपदासाठीचा एक अर्ज बाद झाला.ग्रामपंचायतींमध्ये ७३ सरपंचपदासाठी २१० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर ५४९ सदस्यांसाठी ९२१ उमेदवारी अर्ज दाखल होते. सरपंचपदासाठी अर्ज दाखल केलेल्या अर्जापैकी नांदगाव बुद्रुक येथील एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तर सदस्य पदासाठी दाखल झालेले चार अर्ज अवैध ठरविण्यात आले.यात करंजाडी, नडगांव तर्फे बिरवाडी, फौजी आंबावडे आणि गोठे बुद्रुक येथील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.

टॅग्स :RaigadरायगडElectionनिवडणूक