शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

९८० शेतक-यांची अलिबागमध्ये सुनावणी, सर्वोच्च न्यायालय प्रतिनिधी न्यायाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:56 IST

शहापूर-धेरंड येथील प्रस्तावित टाटा औष्णिक वीज प्रकल्पाला स्थानिक शेतक-यांचा विरोध असून यामधील पाच शेतक-यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अलिबाग : शहापूर-धेरंड येथील प्रस्तावित टाटा औष्णिक वीज प्रकल्पाला स्थानिक शेतकºयांचा विरोध असून यामधील पाच शेतकºयांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पाच शेतक-यांव्यतिरिक्त अन्यही शेतकºयांचा देखील विरोध आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शेतकºयांना त्यांचे म्हणणे मांडण्याकरिता नवी दिल्लीत येण्याऐवजी मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी न्यायाधीश नियुक्त करून शेतकºयांचे म्हणणे स्थानिक पातळीवरच ऐकून घेवून अहवाल सर्वोच्च न्यायालयास सादर करावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मंगळवारी येथील जिल्हा पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात स्थापन करण्यात आलेल्या न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी न्यायाधीश तथा रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.गो.सेवलीकर यांच्यासमोर शेतकºयांची सुनावणी सुरू झाली.शेतकºयांच्या न्याय्य हक्काकरिता त्यांचे म्हणणे स्थानिक पातळीवर जाणून घेण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाने विशेष व्यवस्था करण्याची इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या पाच शेतकºयांप्रमाणे उर्वरित सर्व शेतकºयांचे म्हणणे देखील सर्वोच्च न्यायालयाने जाणून घेणे गरजेचे आहे, अशी भूमिका शेतकºयांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणाºया अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी मांडली होती. ती भूमिका मान्य करुन या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी म्हणून न्यायाधीश तथा रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.गो.सेवलीकर यांची नियुक्ती केली आहे. या सुनावणीत एकूण ९८० शेतकरी आपले म्हणणे नमूद करणार असल्याची माहिती या श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा संघटक राजन भगत यांनी दिली आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड आदी नऊ गावांच्या क्षेत्रावर टाटा-रिलायन्सचे औष्णिक वीज प्रकल्पासाठी तेथील शेतकºयांच्या जमिनी घेतल्या आहेत. यातील बाधित पाच शेतकºयांनी ‘एमआयडीसी’च्या भूसंपादनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. याचिका दाखल केलेल्या पाच शेतकºयांची केवळ तीन एकर शेतजमीन आहे. उर्वरित २ हजार ५०० शेतकºयांची १२०० एकर जमीन कंपनीने आधीच विकत घेतली असल्याने ,या पाच शेतकºयांनी दाखल याचिका फेटाळण्यासाठी एमआयडीसीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयास विनंती केली होती. मात्र शेतकºयांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात लढणाºया अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी या प्रकरणात नक्की किती शेतकरी होरपळले आहेत याची चौकशी करावी. ज्या शेतकºयांच्या जमिनी घेतल्या असे सांगण्यात येत आहे, त्या शेतकºयांनी जमिनीच्या किमतीचे पैसे घेतलेले नाहीत अशी वस्तुस्थिती सर्वोच्च न्यायालयात नमूद केली होती.शेतकरी समाधानीअ‍ॅड. गायत्री सिंग यांनी केलेल्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन या जमिनींपैकी न विकलेल्या जमिनीच्या मालक शेतकºयांचे म्हणणे जाणून घेण्याचा निर्णय दिला. आणि मंगळवारपासून सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष व्यवस्थेच्या माध्यमातून तीन दिवसांच्या या सुनावणीत ९८० शेतकºयांचे म्हणणे आणि साक्षी नोंदवून घेतल्या जाणार आहेत.भूदान चळवळीचे प्रणेते विनोबाजी भावे यांच्या रायगड जिल्ह्यातील शेतकºयांकरिता सर्वोच्च न्यायालयाने विशेष व्यवस्थेचा निर्णय घेवून सर्व शेतकºयांचे म्हणणे येथेच जाणून घेण्याची व्यवस्था केबद्दल मंगळवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शेतकºयांनी समाधान व्यक्त केले.

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी