शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

२१ हजार प्रकरणांत ८ कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:37 IST

राष्ट्रीय लोकअदालत : निपटारा करण्यात रायगड जिल्हा पुन्हा दुसऱ्या स्थानी

अलिबाग : प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरणांचा निपटारा तत्काळ व्हावा, यासाठी राष्ट्रीय लोकअदालत नुकतीच पार पडली. २१ हजार २९३ प्रकरणांमध्ये तडजोड करून तब्बल आठ कोटी ४८ लाख ४९ हजार ४२७ इतक्या रकमेची पक्षकारांना वसुली करून देण्यात यश आले आहे. सर्वाधिक प्रकरणांचा निपटारा करून रायगड जिल्ह्याने महाराष्ट्रात द्वितीयक्र मांक प्राप्त केला आहे. यातील विशेष बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून रायगड जिल्हा सातत्याने पहिल्या ते तिसºया क्रमांकावर आहे.पार पडलेल्या लोकअदालतीमध्ये भूसंपादन, मोटार अपघात, दिवाणी, कलम १३८ एन.आय. अ‍ॅक्ट, विवाह, तडजोडपात्र फौजदारी खटले, दिवाणी-फौजदारी अपील, सहकार न्यायालय आणि कामगार न्यायालय, बँका, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टीसंदर्भातील अशी अनेक वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीमध्ये कामकाजाचा वेगाने निपटारा होण्यासाठी एकूण ३९ कक्ष उभारण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पाच वर्षांपेक्षा जुनी अशी एकूण ५२ प्रकरणे तसेच जुनी १० ते ३० वर्षे जुनी १२ प्रकरणे निकाली काढण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती सचिव रायगड जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश संदीप स्वामी यांनी दिली. तसेच अलिबाग तालुक्यातील मल्याण, उसर, कुणे या गावांतील एमआयडीसीकरिता संपादित झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या वाढीव मोबदल्याचा वाद मागील २० वर्षांपासून प्रलंबित होता. हा वाद लोकअदालतीमध्ये सामोपचाराने मिटवून शेतकºयांना वाढीव नुकसानभरपाई मिळवून देण्यात आल्याकडे वरिष्ठ न्यायाधीश स्वामी यांनी स्पष्ट केले.राष्ट्रीयकृत बँका, महावितरण, विमा कंपन्या, भूसंपादन यांचे अधिकारी आणि सर्व पक्षकारांनी तडजोडीमध्ये पुढे येऊन सहभाग नोंदविला.भरघोस प्रतिसादजिल्हाधिकारी कार्यालय, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, पदाधिकारी, न्यायिक अधिकारी, जिल्हा विधिज्ञ मंडळ, विधि स्वयंसेवक, न्यायालयीन कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले पुढील लोकअदालतीला असाच भरघोस प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा प्राधिकरणाचे अध्यक्ष तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे यांनी व्यक्त केली.मुरुड तालुक्यातील प्रलंबित सहा प्रकरणे निकालीमुरुड : येथील दिवाणी न्यायालयात नुकत्याच आयोजित केलेल्या लोकन्यायालयात प्रलंबित असलेले एक दिवाणी व पाच फौजदारी गुन्हांचा समावेश असलेली प्रकरणे निकाली निघाली. राजपुरी येथील वेलकम पर्यटक संस्था व जंजिरा पर्यटक सहकारी संस्थेमधील वाद विकोपाला जाऊन लोक अदालतीमध्ये हा वाद मिटवला गेला आहे. वेलकम सोसायटीचे चेरमन जावेद कारभारी यांना व्यवसायाच्या वैमनस्यातून पायाला जोरदार दुखापत करण्यात आली होती. सर्व आरोपींवर ३२६ सारखा गंभीर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला होता. असे असतानासुद्धा जावेद कारभारी यांनी मोठे मन करून लोकअदालतीमध्ये हा वाद मिटवल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. हे प्रकरण सामंजस्यामुळे मिटल्याने राजपुरी मोहल्ल्यातील सामंजस्य व शांतता अबाधित राखली जाणार आहे. राजपुरी ते जंजिरा प्रवेशद्वारापर्यंतची पर्यटक वाहतूक आता निर्विघ्न पार पडणार आहे. वस्तुत: जावेद कारभारी यांना गंभीर जखमी केल्याने १२ ते १३ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केल्यामुळे मोहल्ल्याची शांतता भंग पावली होती. तथापि, लोकन्यायालयाची शिष्टाई कामी आली असून, येथील वाद आता कायमचा मिटला आहे. दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एम. ए. के. शेख यांनी जावेद कारभारी व इस्माइल अदमाने यांना गुलाब पुष्प देऊन समेट घडवून आणला आहे. मुरुड पंचायत समिती व मुरुड नगरपरिषद यांची थकीत घरपट्टी व पाणीपट्टीची एक कोटी ५० हजार रुपयांची वसूल करण्यात लोकन्यायालयाला यश मिळाले आहे. पंच म्हणून अ‍ॅड. डी. एन. पाटील व अ‍ॅड. मृणाल खोत यांनी कामकाज पाहिले. या वेळी बार असोसिएशनचे अ‍ॅड. संजय जोशी आदी उपस्थित होते.