शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

६४५ ग्रामीण डाक कर्मचारी बेमुदत संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:20 IST

माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आजही डाक सेवा आपले पाय घट्ट रोवून उभी आहे. डाक सेवेची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्या ग्रामीण भागातील डाक कर्मचाऱ्यांनी विविध

अलिबाग : माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आजही डाक सेवा आपले पाय घट्ट रोवून उभी आहे. डाक सेवेची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्या ग्रामीण भागातील डाक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी २२ मेपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. रायगड जिल्ह्यातील २४८ डाक कार्यालयातील ६४५ कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने सरकारचे तब्बल २५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बेमुदत संपामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प पडल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र सरकारने त्याची गंभीर दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे विविध डाक कर्मचारी संघटना मागण्यांवर ठाम राहण्याच्या पवित्र्यात असल्याने सरकारच्या नुकसानीचा आकडा हा वाढतच जाणार आहे.आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनेसह अन्य चार संघटनांनी अलिबागच्या मुख्य डाक कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. मागण्यांचे निवेदन त्यांनी डाक अधिक्षक यांना दिले.इंटरनेटच्या मायाजालामुळे जग जवळ आले आहे. चुटकीसरशी कामे होत असल्याने वेळेचीही बचत होत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग विविध संस्था, कंपन्या, बँका, सरकारी, निम सरकारी आस्थापनांनी केला. त्याचप्रमाणे डाक विभागानेही तो अंगीकारुन सकारात्मक बदलांचा आपल्या सेवेत समावेश केला. ई-मनी आॅर्डर, मनी ट्रान्सफर, साधे पत्र, रजिस्टर, पार्सल वाटप, मनी आॅर्डर, आरडी, एसबी, टीडी, एसएसए अशा विविध सेवा डाक विभागामार्फत दिल्या जातात.समान काम समान वेतन, सातवा वेतन आयोग, निवृत्त न्यायाधीश कमलेशचंद्र समितीच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी संपूर्ण देशभरातील डाक कर्मचारी संपावर गेले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये २४८ डाक कार्यालये आहेत. त्यामध्ये ६४५ कर्मचारी काम करतात. मात्र सर्वच कर्मचारी २२ मेपासून संपावर गेले असल्याने तब्बल २५० कोटी रुपयांचे सरकारचे नुकसान झाले आहे.२०१६ पासून सरकार डाक कर्मचाºयांच्या तोंडाला पाने पुसत आहे. नुसती आश्वासने देऊन वेळ मारुन नेण्याचा सातत्याने प्रयत्न सरकारकडून होत असल्याने कर्मचाºयांमध्ये असंतोष खदखदत आहे. निवृत्त न्यायाधीश कमलेशचंद्र समितीच्या शिफारशी तातडीने लागू कराव्यात यासह अन्य मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा बेमुदत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनेचे सचिव दिनेश शहापूरकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.उन्हाळा, पावसाळा असो अथवा हिवाळा असो डाक कर्मचारी इमानेइतबारे आपली सेवा नागरिकांना देत असतात. महागाई सातत्याने वाढत आहे मात्र त्याप्रमाणात वेतन वाढ होत नाही. सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला. त्याची अंमलबजावणी केली नाही. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा सरकार विरोधातील राग असाच धगधगत राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. आंदोलकांच्या कठोर पवित्र्यामुळे आंदोलन मागे घेण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. तर दुसरीकडे सरकार यामधून तोडगा काढत नसल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.डाक कर्मचाºयांनी संपाचे हत्यार उपसल्याने ग्रामीण भागातील डाकसेवा पुरती कोलमडून पडली आहे. नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने यातून लवकर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.