शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

बस झाडाला अडकली, म्हणून वाचले ६४ विद्यार्थी; डोंबिवलीतील सहलीच्या बसला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 07:03 IST

बसमधून ६४ विद्यार्थी आणि ६ शिक्षक प्रवास करीत होते. शुक्रवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी हा अपघात झाला. 

खोपोली : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात  शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाला. सुदैवाने ही बस एका झाडाला अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने सर्वजण सुखरूप आहेत. बसमधून ६४ विद्यार्थी आणि ६ शिक्षक प्रवास करीत होते. शुक्रवारी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी हा अपघात झाला. 

डोंबिवलीतील कोपर येथील च. रु. बामा म्हात्रे विद्यामंदिर शाळेची इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्याची सहल एकवीरा येथे बसने गेली होती. एकवीरा येथून दर्शन आटोपून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोलीतील गगनगिरी आश्रम येथे जात असताना शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये त्यांच्या बसचा ब्रेक निकामी झाला. बस झाडाला धडकून अपघात झाला. अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. बस बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. बसमधील विद्यार्थी, शिक्षक यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून गगनगिरी आश्रमामध्ये सुखरूप पोहोचवण्यात आले.  

आश्रमात आसराअपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. बस बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. बसमधील विद्यार्थी, शिक्षक यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून गगनगिरी आश्रमामध्ये सुखरूप पोहोचवण्यात आले. 

टॅग्स :Accidentअपघातdombivaliडोंबिवली