शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दर तासाला ५७६ वाहने कोकणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 05:24 IST

कोकणवासीय चाकरमान्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होत आहे.

अलिबाग : कोकणवासीय चाकरमान्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होत आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागताकरिता कोकणातील आपापल्या गावी पोहोचणाºया चाकरमान्यांच्या वाहनांची मोठी गर्दी गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाढली आहे.सोमवारी रात्री तासाला ५७६ वाहने या मार्गावरून मार्गस्थ झाली. तर, सहा तासांत एकूण तीन हजार ४५६ विविध प्रकारच्या वाहनांतून एक लाखापेक्षा अधिक चाकरमानी गणेशभक्त कोकणात रवाना झाल्याची माहिती रायगड वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.राज्य परिवहन मंडळाच्या नियोजनानुसार, सोमवारी ३५५ एसटी कोकणात रवाना झाल्या. त्यामधून एकूण १७ हजार ७५० गणेशभक्तांनी प्रवास केला.या वाहतुक नियंत्रणासाठी रायगड पोलीस दलास साहाय्य करण्याकरिता विनामोबदला काम करण्याकरिता १४० पोलीस मित्र २४ तास कार्यरत आहेत. ते पळस्पे ते कशेडी या टप्प्यात पेण, वडखळ, वाकण, पाली, कोलाड, माणगाव, लोणेरे, महाड आणि पोलादपूर येथे मार्गदर्शन करत आहेत.दरम्यान कोकणवासीयांनी एसटीलाच अधिक पसंती दिल्याचे आरक्षित एसटी संख्येवरून दिसून येते असल्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले. सेनापती बापट मार्गावरून मुंबईतील जादा एसटी कोकणाकडे रवाना झाल्या. त्यावेळी मंत्री रावते यांनी प्रवाशांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले. मुंबईतील गणपती विशेष फेºया मंगळवारी मार्गस्थ करण्यात आल्या.>चार दिवसांत एक हजार चाकरमान्यांनी घेतले टोल फ्री पासठाणे : कोकणात जाणाºया चाकरमान्यांनी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात टोल फ्री पास घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे. मागील चार दिवसांत जवळपास एक हजार चाकरमान्यांनी हे पास घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांतून प्रवास टाळण्यासाठी चाकरमान्यांनी मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गे टोल फ्री पास घेऊन वेळ आणि इंधन खर्चून कोकण गाठण्याची तयारी के ल्याचे बोलले जात आहे. ंशनिवारपासून ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील मध्यवर्ती जेल व मर्फी कार्यालयात त्यांच्या वाटपास सुरुवात झाली आहे. त्यातच पहिला शनिवार असतानासुद्धा या दिवशी दोन्ही कार्यालयांतून २२० पासचे वाटप झाले होते. मात्र, रविवारची सुटी असताना अवघे ५० पास गेले होते. तसेच सोमवारी काँग्रेस पक्षाने ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या दिवशी जवळपास ४९० पासचे वाटप झाले. मंगळवारीही टोल फ्री पाससाठी आरटीओत गर्दी झाली होती. दुपारी साडेतीनपर्यंत २५० पास वाटप झाले. तर सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत पास वितरित होणार असल्याने आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जाण्या-येण्याचा दुहेरी पास असल्याचे ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक म्हणाले.