शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उरण किनाऱ्यावर आढळला ४० फुटीे मृत देवमासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 06:41 IST

रायगड जिल्ह्यातील उरणच्या खारदांडा समुद्रकिनाºयावर गुरुवारी सकाळी ३५ ते ४० फुटी देवमाशाचा मृतदेह वाहून आला. तो ‘ब्ल्यू व्हेल’य या देवमाशाच्या सर्वात मोठ्या व विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींपैकी असावा, असा वन विभागाच्या अधिका-यांचा प्राथमिक कयास आहे.

उरण : रायगड जिल्ह्यातील उरणच्या खारदांडा समुद्रकिनाºयावर गुरुवारी सकाळी ३५ ते ४० फुटी देवमाशाचा मृतदेह वाहून आला. तो ‘ब्ल्यू व्हेल’य या देवमाशाच्या सर्वात मोठ्या व विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींपैकी असावा, असा वन विभागाच्या अधिका-यांचा प्राथमिक कयास आहे. या देवमाशाचे वजन सुमारे २० टन आहे.गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास गावातील मच्छिमारांना किना-यावर बांधलेल्या दगडी बांधावर देवमाशाचा हा मृतदेह आढळला. तो सडलेल्या अवस्थेत होता व त्याची अनेक हाडेही शरीरातून बाहेर येऊन उघडी पडलेली होती. हा देवमासा काही दिवसांपूर्वी समुद्रातच मरण पावला असावा व भरतीच्या लाटांनी तो वाहत किनाºयावर आला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्राच्या किनाºयावर वाहून आलेला हा आठवा मृत देवमासा आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. याआधी ४० वर्षांपूर्वी सन १९७८ मध्ये एक ४८ फुटी मेलेला देवमासा उरणच्या किनाºयावर वाहून आला होता, अशी आठवण तुकाराम कोळी या स्थानिक मच्छिमाराने यावेळी करून दिली. आढळलेल्या माशाची ओळख पटविण्यासाठी वन विभागाच्या अधिकाºयांनी तपासणीसाठी त्याचे ‘टिश्यू’ काढून घेतले. सडलेल्या अवस्थेतील हा मासा तेथून हलविणे शक्य नसल्यामुळे नंतर तो तेथेच पुरण्यात येणार होता.किनाºयावरील कांदळवनांची जबाबदारी असलेल्या ‘मॅन्ग्रो सेल’चे काम पाहणारे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन म्हणाले की, बाह्यरूपावरून तरी हा ‘ब्ल्यू व्हेल’ असावा, असे वाटते.‘टिश्यू’च्या तपासणीनंतर नक्की प्रजाती कळू शकेल.आजार झाल्याने, म्हातारपणामुळे, समुद्रात एखाद्या जहाजाची धडक बसल्याने अशा एखाद्या संभाव्य कारणाने त्याचा मृत्यू झालेला असू शकेल, असेही ते म्हणाले.सर्वात मोठा सजीव‘ब्ल्यू व्हेल’ प्रजातीचा देवमासा हा पृथ्वीवर उत्क्रांत झालेला सर्वांत मोठा सजीव मानला जातो. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन आॅफ नेचर’ने या प्रजातीचा समावेश विलुप्ततेचा धोका असलेल्या प्राण्यांच्या ‘लाल यादी’त केलेला आहे. भारतात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसारही ही प्रजाती संरक्षित यादीत आहे.

टॅग्स :Raigadरायगडwildlifeवन्यजीव