शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पेणच्या मूर्तिकारांनी साकारले ४०० कोटींचे ३५ लाख बाप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2023 08:22 IST

कोरोना काळात गणेशमूर्तीचा व्यवसाय डबघाईला आला होता. यावर्षी मूर्तींची मागणी वाढली आहे. मात्र, खर्च वाढल्याने मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे.

- दत्ता म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कपेण : कलानिर्मिती क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या गणेशमूर्ती निर्माण नगरीत आता गणेशभक्तांची वर्दळ वाढली आहे. सध्या पेण शहर आणि कलानगरी हमरापूर, जोहे, कळवे, तांबडशेत या चार गावांत घरोघरी गणेशमूर्ती रंगकामाची लगबग सुरू झाली आहे. पेण तालुक्यात यावर्षी ३५ लाख इकोफ्रेंडली आणि पीओपीच्या गणेशमूर्तींची निर्मिती करण्यात आली आहे. तब्बल ४०० कोटी रुपये व्यवसायाची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पेण शहर आणि कलानिर्मिती केंद्र असलेल्या हमरापूर जोहे विभागातील १,२८० कार्यशाळांमध्ये मूर्तिकार कुशल आणि अकुशल असे ६,००० कामगार दिवस-रात्र गणेशमूर्ती रंगकामाचे काम करीत आहेत. पेण शहरात ४५० ते ५०० कार्यशाळांमधून १२ ते १५ लाख गणेशमूर्ती निर्माण केल्या जातात. कलानगरी हमरापूर, जोहे, तांबडशेत, कळवे विभागात ९०० कार्यशाळांमधून जवळजवळ १८ लाख गणेशमूर्ती निर्माण केल्या जातात. 

कोरोना काळात गणेशमूर्तीचा व्यवसाय डबघाईला आला होता. यावर्षी मूर्तींची मागणी वाढली आहे. मात्र, खर्च वाढल्याने मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे.

मूर्तीत २०% वाढ अपेक्षितमहिनाभरात बाप्पाचे आगमन होणार असल्याने गणेशभक्तांना सुबक गणेशमूर्ती रंगकाम ज्वेलरी सजावट करून देण्यात कारागीर युद्धपातळीवर काम करीत आहेत. शाडू माती, रंगाचे दर, सजावटीचे साहित्य महागल्याने आणि वाहतूक वितरण यामुळे यावर्षी गणेशमूर्ती किमतीत १५ ते २० टक्के वाढ अपेक्षित आहे.  

मागील दोन वर्षे गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट होते. आता २०२३ वर्षात हा उत्सव मोठा आनंदाचा असल्याने दरवर्षीप्रमाणे २० ते २५ हजार गणेशमूर्ती परदेशातील आशिया, अमेरिका, ग्रेट ब्रिटन, ऑस्टेलिया, कॅनडा व आखाती देशात रवाना झाल्या आहेत. - नीलेश समेळ, युवा मूर्तिकार, पेण

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव