शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

गुढीपाडवा मुहूर्तावर ३ हजार १७७ कुटुंबांचा गृहप्रवेश

By निखिल म्हात्रे | Updated: March 30, 2025 19:29 IST

या अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात गावातील ४ कुटुंबांचा गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.

अलिबाग- रायगड जिल्ह्यातील घरकुल योजनेतील लाभार्थी ३ हजार १७७ कुटुंबांचा गृहप्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी (दि.३०) करण्यात आला. केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्ग रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. लाभार्थी कुटुंबीयांना गृहप्रवेश करण्यासाठी गावागावात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात गावातील ४ कुटुंबांचा गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपवनसंरक्षक राहूल पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, अलिबाग पंचायत समिती गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, माजी सरपंच मिलिद कवळे यांच्यासह अलिबाग पंचायत समिती अधिकारी, वरसोली ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.रायगड जिल्ह्यात केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजनेंतर्गत मागील काही दिवसात मोठ्या संख्येने घरकुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. कामे वेळेत पूर्ण करून लाभार्थी कुटुंबांना ताबा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. जिल्ह्यात घरकुल योजनांतर्गत ३ हजार १७७ घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. या घरकुलांमध्ये लाभार्थी कुटुंबियांचा गृहप्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. यासाठी गावागावात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गृहप्रवेश कार्यक्रमांचे आयोजन करून, लाभार्थी कुटुंबियांचा गृहप्रवेश करण्यात आला.  रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात ३२२ कुटुंबांचा गृहप्रवेश झाला असून, कर्जत १५६, खालापूर ९८, महाड ३२७, माणगाव ४५३, म्हसळा १०२, मुरुड १५४, पनवेल १४७, पेण ४०२, पोलादपूर ९७, रोहा ४५६, श्रीवर्धन ५०, सुधागड ३१७, तळा ५७, उरण ३९ कुटुंबांचा गृहप्रवेश गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संपन्न झाला.घरकुलांचे कामे अत्यंत नियोजनरित्या पूर्ण करण्यात येत आहेत. याबाबत प्रशासनाचे अभिनंदन. आज अनेक कुटुंबांचे घरकुलांच स्वप्न पूर्ण झाले आहे. आणखी जे कुणी पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहिले असतील ते लाभार्थी शोधून त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा.- महेंद्र दळवी, आमदारआज आम्हाला निवारा प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घरकुल योजनेतून आम्हाला घर बांधून मिळाले. याबाबत प्रशासनाचे आभार. - अरुणा पवार, लाभार्थी, वरसोली.

टॅग्स :alibaugअलिबाग