शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

उपोषण मोर्चा आंदोलनांनी गाजले 2023

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 12:12 IST

- निखिल म्हात्रे लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - सन 2023 हे वर्ष आंदोलन मोर्चे व उपोषणाचे ठरले असून यामध्ये सर्वाधिक ...

- निखिल म्हात्रेलोकमत न्युज नेटवर्कअलिबाग - सन 2023 हे वर्ष आंदोलन मोर्चे व उपोषणाचे ठरले असून यामध्ये सर्वाधिक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. उपोषणांध्ये बहूतकरुन रस्ते दुरुस्ती, जमीन मोजणी, गॅस दरवाढ, ग्रामपंचायत ठराव व भ्रष्टाचार, मैदानातील अतिक्रमण,नगरापालिका भ्रष्टाचार, कामगारांच्या प्रलंबित मागणी, घरकुल भ्रष्टाचार, पाणी पुरवठा भ्रष्टाचार यासह एक ना अनेक आंदोलनांनी 2023 हे वर्ष गाजले असून यामध्ये आतघाई करणाऱ्या उपोषण व आंदोलन करणाऱ्या नागरीकांवर कारवाईचा बडगा हि उगारण्यात आला होता.एखाद्या व्यक्तीस सतत अन्यायाला सामोरे जाव लागल्याने आपल्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात वाचा फोडण्यासाठी 1 जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत 102 उपोषण, 74 मोर्चे, तर 77 विविध प्रकारची आंदोलन जिल्ह्यातील विविध सरकारी कायार्लयांच्यासमोर करण्यात आली होती. 12 महिन्यात सतत झालेल्या अंदोलनांमध्ये सर्वाधिक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये साधरणत: 40 टक्के नागरीकांनी शिस्त भंग केल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता.

जानेवारी 2023 मध्ये खानव-उसर येथील प्रकल्प ग्रस्तांनी आपल्याला नोकरीत सामावून घेण्यासाठी, ईंदूबीई तिखंडे यांनी घरकुला संदर्भात, उर्मिला जनार्दन नाईक मोजनीसंदर्भात, दिलीप जोग यांनी रस्ता, जिल्हा रुग्णालय संदर्भात, गोपाळ शिर्के यांनी रस्ता सुधारण्या संदर्भात, कोकाटे यांनी रिलायन्स कंपणी संदर्भात तर दत्तात्रेय हिरु गायकवाड यांनी विज मिटर मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे अशा एक ना अनेक कारणांसाठी गेल्या 12 महिन्यात 102 उपोषण झाली.

तर आंदोलन, धरणे आंदोलन, हल्ला बोल आंदोलन, कामबंद आंदोलन, चक्काजाम आंदोलन, जनजागृती आंदोलन, वाहतूक बंद आंदोलन, रजा बंद आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, ठिय्या आंदोलन, ढोल-ताशा गजर आंदोलन, थाळीनाद आंदोलन, सामुहीक रजा बंद आंदोलन, भिक मागो आंदोलन, अन्न त्याग आंदोलन, अशी साधारणत: विविध प्रकारची 77 आंदोलन करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक आंदोलन ही जिल्ह्यातील महत्वाचे व अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्ती संदर्भात करण्यात आली.  गेल कंपणीच्या प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या आंदोलनात आंदोलनकर्त्यांना पोलिसांच्या कारवाईला ही सामोरे जावे लागले आहे.

आजवर स्वत:च्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या उपोषण व आंदोलनकर्त्यांपैकी 40 टक्के नागरीकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे गेले आहेत. तर 40 ते 45 टक्के नागरीकांच्या प्रश्न आज तडीस नले आहेत. तर उर्वरीत नागरीकांच्या समस्या सोडविण्याकडे सन २०२४मध्ये तरी लक्ष केंदीत करेल का? असा प्रश्न मात्र कायम आहे.

टॅग्स :agitationआंदोलन