शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित वाढवण बंदरासाठी २०० दशलक्ष क्युबिक मीटर वाळूची आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 21:29 IST

मच्छीमारांचा वाढवण बंदरासाठी प्रचंड विरोध आहे.

- मधुकर ठाकूर

उरण : जेएनपीए प्रस्तावित सुमारे ७८ हजार कोटी खर्चाचे वाढवण बंदरासाठी जमीन तयार करण्यासाठी ड्रेजिंग करून २०० दशलक्ष क्युबिक मीटर वाळूकाढण्यात येणार आहे.ही चांगल्या प्रतीची वाळू मिळविण्यासाठी प्रस्तावित वाढवण बंदरापासून अरबी समुद्रात सुमारे ६०  किलोमीटर अंतरावर आणि दमण किनार्‍यापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर सॅण्ड बॉरो पिट (साठा) शोधला असल्याची माहिती जेएनपीएने प्रसिद्ध पत्रकातून दिली आहे.

मच्छीमारांचा वाढवण बंदरासाठी प्रचंड विरोध आहे. मच्छीमारांच्या विरोधानंतरही जेएनपीए प्रस्तावित सुमारे ७८ हजार कोटी खर्चाचे वाढवण बंदर उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.डहाणू तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या आणि ग्रीनफील्ड बंदराच्या विकासासाठी पर्यावरण मंजुरी मिळविण्याचा एक भाग म्हणून मिनिस्ट्री ऑफ इन्व्हारर्मेंट आणि क्लायमेट चेंज (सीसी) आदी विभागाच्या निर्देशानुसार २१ डिसेंबर २०२३ रोजी दमण येथे २ जुन २०२३ च्या अतिरिक्त टीओआरनुसार ( टर्म ऑफ रेफरन्स) सुनावणी घेण्यात आली. 

दमण येथे ही जनसुनावणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समितीने दमण, दादरा आणि नगर हवेलीचे उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित केली होती. या जनसुनावणीसाठी विविध भागधारक आणि मच्छीमार समुदाय उपस्थित होते. सार्वजनिक सुनावणी दरम्यान संबंधितांनी व्यक्त केलेल्या विविध चिंतांचे निराकरण करण्यात आले. वाढवण बंदराच्या विकासासाठी सर्वसमावेशक पर्यावरण मंजुरीसाठी सार्वजनिक सुनावणीचे कार्यवृत्त मिनिस्ट्री ऑफ इन्व्हारर्मेंटकडे पाठवले जाणार असल्याचे जेएनपीएने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जेएनपीएच्या प्रस्तावित वाढवण बंदरावर जमीन तयार करण्यासाठी २०० दशलक्ष क्युबिक मीटर वाळू लागणार आहे. चांगल्या प्रतीची वाळू मिळविण्यासाठी प्रस्तावित वाढवण बंदरापासून अरबी समुद्रात सुमारे ६० किलोमीटर अंतरावर आणि दमण किनार्‍यापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर सॅण्ड बॉरो पिट (साठा) शोधून काढण्यात आला आहे.ही वाळू ड्रेजिंग करून काढण्यात येणार आहे.अशी माहिती जेएनपीएने प्रसिद्ध पत्रकातून दिली आहे. 

टॅग्स :Raigadरायगड