शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्हा परिषदेतील १६४ दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात; प्रमाणपत्र, ‘यूडीआयडी’ची ठाण्यात फेरतपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 09:44 IST

राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी आणि यूडीआयडी कार्ड फेरतपासणी केली जात आहे.

अलिबाग : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार घेतल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी आणि यूडीआयडी कार्ड फेरतपासणी केली जात आहे. मुंढे यांच्या आदेशानंतर दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना व्यापक पडताळणीचे निर्देश दिले आहेत. रायगड जिल्हा परिषदेतील ३१८ दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता १६४ जण संशयाच्या भोवऱ्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे येथे या कर्मचाऱ्यांची फेरतपासणी केली जाणार आहे.  

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेक जणांनी शासकीय नोकरी मिळवली आहे. त्यामुळे खरे दिव्यांग नोकरीपासून वंचित राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत ३१८ दिव्यांग कर्मचारी सेवेत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांची पडताळणी झाली. जिल्हा रुग्णालयात आरोग्य अधिकारी यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला. यामध्ये १६४ दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत संशय निर्माण झाला होता. त्यामुळे १६४ जणांची फेरतपासणी ठाणे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात केली जाणार आहे. त्यांच्या अहवालानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

कारवाईची टांगती तलवार

राज्यात सांगली येथे जिल्हा परिषदेच्या १३ शिक्षक आणि एक कर्मचारी यांनी कागदपत्रे सादर न केल्याने तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. 

रायगड जिल्हा परिषदेच्या संशयित १६४ जणांवर ही कारवाईची टांगती तलवार उभी आहे. ठाणे येथून अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. फेरतपासणीच्या निर्णयामुळे  जिल्हा परिषदमध्ये खळबळ उडाली आहे. 

रायगड जिल्हा परिषदेच्या १६४ दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत संशय निर्माण झाल्याने त्यांच्या कागदपत्राची फेरतपासणी करण्यासाठी ठाणे येथे पाठविण्यात आले आहे. काही जणांनी ठाणे येथे जाऊन फेरतपासणी केली आहे, मात्र त्याबाबत अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही आहे.नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड

English
हिंदी सारांश
Web Title : Raigad: 164 disabled employees under scrutiny; certificates re-verified in Thane.

Web Summary : IAS officer Tukaram Mundhe ordered re-verification of disability certificates in Raigad Zilla Parishad. 164 employees are under suspicion. Their documents will be re-verified in Thane to ascertain authenticity, following complaints of fake certificates.
टॅग्स :alibaugअलिबाग