लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव : माणगाव तालुक्यातील इंदापूर बायपासजवळील कशेणे गाव परिसरात शनिवारी पहाटे ३:३० च्या सुमारास बसचे टायर पंक्चर झाल्यामुळे खाली उतरून रस्त्याच्या कडेला बसलेल्या सुमारे १६ प्रवाशांना भरधाव कारने उडवले. अपघातात १४ जण जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना तातडीने मुंबई येथे हलविण्यात आले आहे.मुंबईवरून कोकणात निघालेल्या आयशर बसचे (क्रमांक एम. एच. ४८, सी. बी. ४४९३) टायर पंक्चर झाल्याने चालकाने वाहन महामार्गाच्याकडेला उभे केले. बसमधील सुमारे ४० प्रवासी खाली उतरले होते. काही प्रवासी रस्त्याच्या कडेला बसले होते, तर काहीजण बाजूला उभे राहून टायर बदलण्याची प्रतीक्षा करत होते. याचवेळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने (क्रमांक एम. एच. ०९, एफ. वाय. ६६००) अचानक नियंत्रण गमावल्याने रस्त्याच्या कडेला बसलेल्या प्रवाशांना जोरदार धडक दिली. बेसावध असलेल्या प्रवाशांना काही समजण्याआधीच कार अंगावर आल्याने आरडाओरडा आणि गोंधळ उडाला.
अपघाताबाबत माणगाव पोलिस ठाण्यात कारचालक दिग्विजय पांडुरंग सुतार विरुद्ध गुन्हा दाखल आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
जखमी प्रवाशांची नावे : जयहरी गोविंद मालप (वय ५६, रा. मुंबई), स्वरुप सुदर्शन केंद्रे (१३), सुमिथी सुदर्शन केंद्रे (३८ दोघे रा. वरळी, मुंबई), बबन विठोबा देवडे (५५), निशान बबन देवडे (२७, दोघे रा. महाड), सुप्रिया सुनील केंद्रे (४४, रा. कांदिवली, मुंबई), पूजा सुरेश येलकर (२६, रा. महाड), कौस्तुभ शशिकांत लांबे (१६, रा. मंडणगड), सुरेश सखाराम येलकर (५६, रा. महाड), जानवी विवेक रेशिम (३६, रा. गोरेगाव, मुंबई), निर्मला रामदास सातगोडे (५३, रा. विरार, पालघर), प्रगती हिरलेकर (३५, मंडणगड), साहील केंद्रे (१८), शेजल केंद्रे (२०, दोघे रा. महाड)
जखमींची वेदनेने तडफडअपघातात काही प्रवाशांच्या हात, पाय, खांदा, मांडी, कंबर आणि बरगड्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. सर्व जखमींना तातडीने माणगाव येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असलेल्या चार जखमींना उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. अपघाताची बातमी समजताच रुग्णालयात कुटुंबीयांसह नातेवाइकांची गर्दी उसळली होती. जखमींना वेदनेने तडफडताना पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
Web Summary : Near Mangaon, a speeding car hit 16 passengers whose bus had a flat tire. Fourteen were injured, four critically, and were moved to Mumbai for treatment. The car driver has been charged.
Web Summary : माणगाँव के पास एक तेज रफ्तार कार ने 16 यात्रियों को टक्कर मार दी, जिनकी बस का टायर पंक्चर हो गया था। चौदह घायल, चार गंभीर रूप से घायल, इलाज के लिए मुंबई ले जाए गए। कार चालक पर आरोप लगाए गए हैं।