शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आठ महिन्यात ११२ बेवारस मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 23:58 IST

रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्यानं वाढत आहे. त्याच बरोबर येथील नागरीकरणातही वाढ होत असून, जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे.

लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. औद्योगिकीकरणासोबत नागरिकरण वाढल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. दिवसाला जिल्ह्यात ७ ते ८ गुन्ह्यांची नोंद पोलीस दफ्तरी होत आहे. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांची दमछाक होत असताना, आत्ता पोलिसांसमोर ठिकठीकाणी बेवारस सापडणार्‍या मृतदेहांच्या नातेवाईकांचा शोध लावण्यासोबतच या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हाण समोर ठाकले आहे. तसेच बेवारस मृतदेहांचे नातेवाईक न सापडल्यास कोही मृतदेहांवर अंत्यसंस्कारही पोलिसांना करावे लागत असल्याचे वास्तवही समोर आले आहे.

रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्यानं वाढत आहे. त्याच बरोबर येथील नागरीकरणातही वाढ होत असून, जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. याचबरोबर गुन्हेगारीचे स्वरुपही बदलले असून, गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांची दमछाक होत आहे. जिल्ह्यात १ जानेवारी ते २०ऑगस्ट या काळावधीत रायगड जिल्हा पोलीस दुरक्षेत्र हद्दीत ११२ बेवारस मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बेवारस मृतदेहांची ओळख पटवित गुन्ह्यांची उकल करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले आहेत. सापडलेल्या ११२ बेवारस मृतेहांपैकी ८६ मतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांनी यश मिळाले असून, उर्वरित २६ बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये सध्या बेवारस मृतदेह मोठ्या संख्येने सापडत आहेत. चालू वर्षात म्हणजे १ जानेवारी ते  २० ऑगस्टपर्यंत रायगड जिल्ह्यात ११२ बेवारस मृतदेह सापडले आहेत. या सर्व मृतदेहांची नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे.काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील असण्याची शक्यता -रायगड जिल्ह्यात सापडत असलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील असण्याची शक्यता आहे. एकाद्या व्यक्तिचा खून करुन त्याचा मृतदेह जिल्ह्यातील निर्जन स्थळी टाकण्यात येत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी राज्यभर गाजलेल्या शीना बोरा प्रकरणाने हे सिद्ध झाले आहे. शिना बोरा हिची मुंबईत हत्या करुन मृतदेहाची रायगड जिल्ह्यात विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.बेवारस मृतदेहावर अत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पोलिसांवर -सापडलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह हे वैद्यकीय महाविद्यालयाला दिले जातात. ३ ते ७ दिवसात या बेवारस मृतदेहाचे अंत्यविधी करायचे असते. कित्येकदा पोलिसांना तपास करण्यास काही महिने लागतात. परिणामी मृतदेह सडू लागतात. या मृतदेहाचे अंत्यविधी करण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. अंत्यविधीचा खर्चही पोलिसांना करावा लागतोे. तर काही वेळेस स्थिनिक स्वराज्य संस्थांची बेवारस मृतदेहावर अत्यंसंस्कार करण्यासाठी पोलीस मदत घेतात.