शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

कर्नाळ्यात आढळले 103 प्रजातींचे पक्षी, पहिल्यांदाच स्वतंत्र पक्षिगणना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 00:05 IST

karnala bird sanctuary : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि पक्ष्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पहिल्यांदाच पक्षिगणना पार पडली.

- वैभव गायकर

पनवेल : कर्नाळा पक्षी अभयारण्यात प्रथमच पक्ष्यांची स्वतंत्र गणना पार पडली. १९ ते २० डिसेंबर या दोन दिवसीय गणनेत निरीक्षकांना १०३ प्रजातींचे पक्षी या ठिकाणी आढळले. वन्यजीव विभाग ठाणे आणि ‘ग्रीन वर्क ट्रस्ट’ संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि पक्ष्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पहिल्यांदाच पक्षिगणना पार पडली. महत्त्वाचे म्हणजे शास्त्रीय पद्धतीने पक्षी मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाइन ट्रान्झॅक्ट आणि पॉइंट काउंट पद्धतीद्वारे ही गणना करण्यात आली. १९ ते २० डिसेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत पार पडलेल्या पक्षिगणनेत एकूण २७ जण सहभागी झाले होते. यामध्ये वन विभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच पक्षितज्ज्ञ, छायाचित्रकार, ई-बर्ड या संकेतस्थळाच्या वापरकर्त्यांचा समावेश होता. या पक्षिगणनेची सुरुवात राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनील लिमये यांच्या हस्ते झाली. या वेळी ठाण्याचे उपवनसंरक्षक (वन्यजीव) भानुदास पिंगळे, साहाय्यक वनसंरक्षक नंदकुमार कुप्ते, कर्नाळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण आणि ‘ग्रीन वर्क ट्रस्ट’चे निखिल भोपळे आदी उपस्थित होते.

या पक्ष्यांचा समावेश१०३ प्रजातींच्या पक्ष्यांमध्ये २० स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. या पक्ष्यांमध्ये जंगल बबलर, ब्राऊन हेडेड बार्बेट, ग्रीन बी ईंटर, लिटल कार्मोरंट, इंडियन स्कोप वोल्व्ह, यलोव्ह काउंट वुडकीपर, इंडियन पित्ता, मलबार विस्टिंग थ्रश, कॉमन लॉरा, ब्लॅक ड्रॉगो, इंडियन ईगल, जंगल नाइटजर, ग्रेटर रॅकेट टेल्ड, ड्रोगो, हाउस क्रो, बुटेड ईगल आदींसह विविध पक्ष्यांचा समावेश आहे.

पक्षिगणनेसाठी तज्ज्ञ लोकांचे नऊ ग्रुप केले होते तयार कर्नाळा पक्षी अभयारण्यात एकूण ९ लाइन ट्रान्सिट तयार करण्यात आले होते. पक्षिगणनेत सहभागी झालेल्या तज्ज्ञ लोकांचे नऊ ग्रुप तयार करण्यात आले. यात प्रामुख्याने वनविभागाचे कर्मचारी व ग्रीन वर्क ट्रस्ट या संस्थेचा सदस्य यांचा समावेश होता. प्रत्येक लाइन ट्रान्झिट हे ५०० मीटर अंतराचे होते. अशा प्रत्येक ९ लाइन ट्रान्झिट परिसरामध्ये पक्षी निरीक्षण हे डाव्या-उजव्या तसेच समोरील बाजूस २० मीटरपर्यंत दिसणाऱ्या पक्ष्यांची नोंद करण्यात आली. पक्ष्यांच्या नोंदी या ई-बर्ड या ॲप्लिकेशनद्वारे जगभरात दिसून येणार आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य