शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवमंदिरासाठी जागा देण्यास जेएनपीए राजी नसल्याने १०० कोटींच्या जासई उड्डाणपूलाच्या मार्गिकेचं काम रखडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 18:01 IST

जेएनपीए -नवी मुंबई दरम्यान प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीमुळे दास्तानफाटा जासई ते गव्हाणफाटा दरम्यान दररोज वाहतूक कोंडी होत होती.

मधुकर ठाकूर

उरण : उरण, नवीमुंबई,जेएनपीए बंदराशी जोडणाऱा आणि वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा समजला जाणाऱ्या जासई उड्डाणपूलावरील दुसरी मार्गिका वादात सापडली आहे.या मार्गिकेमध्ये येत असलेल्या शिवमंदिरासाठी ४० गुंठे जागे ऐवजी जेएनपीएने २५ गुंठे जागाच देऊ केली आहे.जासई ग्रामस्थ यासाठी अद्यापही राजी नसल्याने मात्र जासई उड्डाणपुलाची दुसऱ्या मार्गिकेचे काम रखडले आहे.

जेएनपीए -नवी मुंबई दरम्यान प्रचंड प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीमुळे दास्तानफाटा जासई ते गव्हाणफाटा दरम्यान दररोज वाहतूक कोंडी होत होती. या वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी दास्तानफाटा-जासई ते शिवमंदिर दरम्यान १२०० मीटर लांबीचा आणि सुमारे १०० कोटींहून अधिक खर्चाचा चौपदरी जासई उड्डाणपूल उभारण्यात येत आहे.शिवमंदिराच्या अडथळ्यामुळे या उड्डाणपूलाचे काम मागील आठ वर्षांपासून रखडत रखडत सुरू आहे.दरम्यान या जासई उड्डाणपूलावरील एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. ही एक मार्गिका चार-पाच महिन्यांपूर्वी अभियंता दिनाचे औचित्य साधून गणपती सणाच्या अगोदरच वाहतूकीसाठी खुली करण्यात आली आहे.

ग्रामस्थ, ग्रामपंचायतीशी वारंवार झालेल्या बैठका, चर्चेनंतर जेएनपीएने शिवमंदिर दुसरीकडे हटवून मंदिर पुन्हा उभारण्यासाठी रांजणपाडा गावानजीक २५ गुंठे जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे.मात्र जासई ग्रामस्थांना शिवमंदिरासाठी ४० गुंठे जागाच हवी आहे.शिव मंदिरासाठी ४० गुंठे जागा मिळावी याच मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत. ग्रामस्थांच्या मागणीवर अद्यापही जेएनपीए प्रशासनानेही कोणत्याही प्रकारचा तोडगा काढलेला नाही.यामुळे वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या जासई उड्डाणपूलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम रखडले असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपाध्यक्ष यशवंत घोटकर यांनी दिली.