शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

पेण बँकेच्या ठेवीदारांकडून १०% ची वसुली

By admin | Updated: September 15, 2015 23:20 IST

पेण अर्बन बँकेतील १० हजार रुपयेपर्यंतच्या ठेवीदारांना जमा झालेल्या रकमेतून पैसे देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पेण बँकेच्या १८ शाखांमधून धनादेश देण्याचे

खोपोली : पेण अर्बन बँकेतील १० हजार रुपयेपर्यंतच्या ठेवीदारांना जमा झालेल्या रकमेतून पैसे देण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर पेण बँकेच्या १८ शाखांमधून धनादेश देण्याचे काम सुरू झाले आहे. गेली पाच वर्षे बँकेत अडकलेले पैसे यंदाच्या गणपतीला मिळणार असल्याने ठेवीदारांच्या चेहऱ्यावरील आनंद संघर्ष समितीचे पदाधिकारी मिळालेल्या रकमेतून १० टक्के रक्कम सक्तीने घेत असल्याने काहीकाळच टिकत असून ठेवीदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.रायगड जिल्ह्यातील ७५ वर्षांची परंपरा असलेली पेण अर्बन बँक पाच वर्षांपूर्वी बंद झाली. यामुळे ठेवीदारांचे करोडो रुपये बँकेत अडकले होते. गेली पाच वर्षे हे पैसे मिळावेत म्हणून ठेवीदारांचा संघर्ष सुरू आहे. बँकेच्या रायगड जिल्ह्यात १६ व मुंबईत दोन शाखा होत्या. यातील खोपोली, शिळफाटा व कर्जतमधील शाखांमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम मोठी आहे. गरीब कुटुंबातील अनेकांनी आपली आयुष्यभराची कमाई बँकेत ठेवली होती. लहान व्यावसायिकांनीही आपले पैसे बँकेत गुंतवले होते. बँक बंद झाल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. बँक बंद होवून पाच वर्षे झाल्याने आपले पैसे मिळतील ही आशाच ठेवीदारांनी सोडली होती. मात्र पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे न्यायालयाने जमा झालेल्या रकमेतून १० हजार रुपयापर्यंत ठेवी असलेल्या छोट्या ठेवीदारांना पैसे देण्याचे आदेश दिल्याने ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.बँकेत गेल्यानंतर मिळालेल्या रकमेतून संघर्ष समिती १० टक्के रक्कम घेत असल्याने ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. संघर्ष समितीने विविध ठिकाणी घेतलेल्या बैठकांमध्ये खर्च करण्यासाठी अशा प्रकारे पैसे घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तरीही लहान ठेवीदारांचा १० टक्के रक्कम देण्यास विरोध आहे. न्यायालयीन प्रक्रि येसाठी ही रक्कम घेत असल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे असून १० हजाराच्या आतील ठेवीदारांकडून पैसे घेण्यापेक्षा मोठ्या रकमेच्या ठेवीदारांकडून ही रक्कम घेण्यात यावी असे अनेक लहान ठेवीदारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. बँकेच्या सर्व शाखांमध्ये सक्तीने ही रक्कम घेतली जात असल्याने ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.पेण बँकेच्या १८ शाखांमध्ये सुमारे ६३२ कोटी रूपये अडकले आहेत. हे पैसे मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळेच लहान ठेवीदारांना आपली रक्कम परत मिळत आहे. न्यायालयीन प्रक्रि येला मोठा खर्च येत असल्याने ही रक्कम ठेवीदारांकडून घेतली जात आहे. यासाठी कुठलीही सक्ती करण्यात येत नाही.- चिंतामण पाटील, सदस्य-पेण अर्बन बँक संघर्ष समिती