शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
4
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
5
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
6
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
7
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
8
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
9
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
10
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
11
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
12
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
13
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
14
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
15
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
16
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
17
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
18
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
19
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
20
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 02:06 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आरोग्यसेवेत राज्यात बाजी मारली आहे.

पुणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आरोग्यसेवेत राज्यात बाजी मारली आहे. राज्य शासनाने केलेल्या सर्वेक्षणात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, पीपीआययूसीडी, गरोदर माता नोंदणी, लसीकरण यांसह अन्य आरोग्यसेवा चांगल्या दर्जाच्या पुरवल्याचे आढळले असून, त्यासाठी त्यांना शंभरपैकी ८२ गुण मिळाले आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा आकडा चांगला असल्याने पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल ठरला आहे.ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरविण्याचे काम हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असते. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या साह्याने तसेच आरोग्यसेवकांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. या आरोग्यसेवेची पाहणी करण्यासाठी तसेच राज्यातील आरोग्यसेवा चांगल्या पद्धतीने सुरू राहावी आणि रुग्णांना सेवा देताना तत्काळ व उत्तम सेवा मिळते की नाही, हे पाहण्यासाठी राज्य शासनाकडून दर वर्षी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे रँकिंग काढण्यात येते. यामध्ये प्रत्येक विभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे, रुग्णांची नोंदणी, साथीच्या रोगांवर कशा पद्धतीने नियंत्रण आणले, तत्काळ आरोग्यसेवा या सर्व गोष्टींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात प्रत्येक गोष्टीला स्वतंत्र गुण दिले जातात. या सर्वेक्षणात पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हा अव्वल ठरला. कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, पीपीआययूसीडी, गरोदर माता नोंदणी, लसीकरण यांसह अन्य आरोग्यसेवा चांगल्या दिल्याने त्यांना या सर्वेक्षणात ८२ गुण मिळाले.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागप्रमुख डॉ. दिलीप माने यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपक्रेंद्रांतील सेवेला शिस्त लावून आवश्यक त्या नोंदी तत्काळ करून घेतल्या.यामध्ये कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, गरोदर मातांची नोंदणी आणि वेळोवेळी पाठपुरावा करणे, लसीकरणात उत्तम काम केले आहे. तसेच, स्वाइन फ्लूच्या साथीदरम्यान आरोग्य विभागाने चांगले काम केल्याने सर्वाधिक गुण देण्यात आले.>अधिकारी, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला प्रथम क्रमांक मिळू शकला. कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे हे फळ आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आणि आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांचेही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळाले. हा क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रत्येक रुग्णाला चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत.- डॉ. दिलीप माने, आरोग्यप्रमुख,जिल्हा परिषद, पुणे