शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भोर तालुक्यात झेंडूचे फुलले मळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 19:51 IST

भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील विसगाव, चाळीसगाव खोऱ्यात डोंगरी भागात अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची शेती केल्याने नवरात्रोत्सव काळात झेंडूचे मळे फुलले आहेत.

ठळक मुद्देसणासुदीच्या काळात झेंडुच्या मागणीत वाढ सध्या ५० ते ६० रुपये किलोला भाव पुढील काळात १०० ते १२० रुपये किलोला भाव मिळेल अशी तालुक्यातील शेतकऱ्यांना आशा

नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील विसगाव, चाळीसगाव खोऱ्यात डोंगरी भागात अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची शेती केल्याने नवरात्रोत्सव काळात झेंडूचे मळे फुलले आहेत. यामुळे दसरा व दिवाळी सणासाठी परिसरात झेंडूचा सुगंध दरवळू लागला असून परिसरातील झेंडूची शेती पिवळी धमक दिसत आहे.विसगाव तसेच चाळीसगाव खोऱ्यातील नेरे, आंबाडे, खानापूर, वरवडी, पळसोशी, बाजारवाडी, गोकवडी, आंबवडे, कर्णावड, करंजे, निळकंठ परिसरातील शेतकऱ्यांनी आगामी दसरा व दिवाळी सणाच्या काळात फुले तोडणीस येतील. या नियोजनाने झेंडूची लागवड करण्यात आली होती. या परिसरात अष्टगंधा, कलकत्ता, गोल्डस्पॉट या जातीचा झेंडू मोठ्या प्रमाणावर उत्पादित केला जातो. सणांच्या काळात झेंडूला विशेष मागणी असल्याने सध्या ५० ते ६० रुपये किलोला भाव आहे. पुढील काळात १०० ते १२० रुपये किलोला भाव मिळेल अशी तालुक्यातील शेतकऱ्यांना आशा आहे. मागील महिन्यात झेंडूला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र बुधवारपासून नवरात्रोत्सव सुरु झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.झेंडू उत्पादकांना देवी पावेलनवरात्रोत्सव काळात अवकाळी पाऊस बरसला नाही तर तालुक्यातील फुललेले झेंडूचे मळे वाया जाणार नाहीत. उत्पन्नात वाढ होईल व  असणारा किलोचा 60 ते  70 रुपयांचा बाजारभाव टिकून राहील. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना देवी पावेल असे वाटत असल्याचे करंजे (ता. भोर)  येथील झेंडू उत्पादक शेतकरी विजय कुडले यांच्याकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Puneपुणे