शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीच्या वादामध्ये मध्यस्थी केल्यावरून तरूणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 16:17 IST

सोसायटीच्या वादामध्ये मध्यस्थी करण्याच्या कारणावरून संबंधित व्यक्तीच्या दोन मुलांना मारहाण करीत एकावर चाकूने वार करून खून करण्याचा प्रकार कोंढवा खुर्द रस्त्यावरील हमजा हेअर सलून दुकानासमोर दुपारी पावणेबारा वाजता घडला.

ठळक मुद्देमारहाण करीत एकावर चाकूने वार करून खून करण्याचा प्रकार कोंढवा खुर्द रस्त्यावरील हमजा हेअर सलून दुकानासमोर घडला.आकीब अल्ताफ शेख (वय २६) असे खून झालेल्याचे तर ऐसर अल्ताफ शेख (वय १८) जखमी झालेल्याचे नाव आहे. चौघा आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली

पुणे : सोसायटीच्या वादामध्ये मध्यस्थी करण्याच्या कारणावरून संबंधित व्यक्तीच्या दोन मुलांना मारहाण करीत एकावर चाकूने वार करून खून करण्याचा प्रकार कोंढवा खुर्द रस्त्यावरील हमजा हेअर सलून दुकानासमोर दुपारी पावणेबारा वाजता घडला. याप्रकरणी सोसायटीमधीलच चार आरोपींना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. सुददीन कुरेशी ( वय ३५, रा. आदितांश सोसायटी, कोंढवा खुर्द), रिवाज उर्फ युसुफ साबीर खान (वय ३६), महंमद मुदस्सर फैयाज अहमद पठाण (वय ३२) आणि जावेद हमीद इनामदार (वय ४४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आकीब अल्ताफ शेख (वय २६) असे खून झालेल्याचे तर ऐसर अल्ताफ शेख (वय १८) जखमी झालेल्याचे नाव आहे. अल्ताफ शेख (वय ५५, रा. स. नं ३८/१/३ पोकळे मळा, कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र रफीक बाबू शेख हे आदितांश सोसायटीच्या वादामध्ये मध्यस्थी करतात. या कारणावरून फिर्यादी यांचा मुलगा ऐसर हा दाढी करण्यासाठी सलूनच्या बाहेर उभे असताना सोसायटीमध्ये राहाणार्‍या आरोपींनी ऐसर याला तुझा बाप कोठे आहे? तो आमच्या सोसायटीमध्ये खूप मध्यस्थी करायला येतो. त्याला मस्ती आली आहे का? अशी विचारणा करून त्याला शिवीगाळ केली. तिथे फिर्यादी यांचा मुलगा आकीब आल्यानंतर त्यांच्यामध्ये पुन्हा भांडणे झाली. फिर्यादी हे त्यांची भांडणे सोडवायला गेले असता त्यांच्या दोन्ही मुलांना मारहाण करून ऐसरच्या छातीवर चाकूने वार करून त्याला जखमी केले तर आकीब याच्या हाताला धरून चाकू त्याच्या छातीत खुपसून त्याला ठार मारल्याने चौघा आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड करीत आहेत. 

टॅग्स :crimeगुन्हेMurderखून