शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘वाय-फाय’ अड्ड्यांवर तरुणांचा 'ठिय्या'; पुण्यात १५० ठिकाणी ‘वाय-फाय हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 15:23 IST

स्मार्ट सिटी अतंर्गत शहरामध्ये सुमारे १५० ठिकाणी ‘वाय-फाय हॉटस्पॉट’चे बिटा व्हर्जन सुरु करण्यात आले आहे. शहरातील ‘वाय-फाय’ अड्ड्यांवर तरुणांचा ठिय्या वाढू लागला आहे.

ठळक मुद्देविविध १५० ठिकाणी सुरु करण्यात आले वाय-फाय हॉटस्पॉटमोफत वाय-फायमुळे चांगलाच वाढला नेट सॅव्ही तरुणाईचा उत्साह

पुणे : स्मार्ट सिटी अतंर्गत शहरामध्ये सुमारे १५० ठिकाणी ‘वाय-फाय हॉटस्पॉट’चे बिटा व्हर्जन सुरु करण्यात आले आहे. शहरातील ‘वाय-फाय’ अड्ड्यांवर तरुणांचा ठिय्या वाढू लागला असून, दैनंदिन कामकाज, आॅनलाईन संदेश पाठविणे, योजनांची माहिती घेणे, ई-बुक, व्हिडिओ पाहणे आणि परदेशातील आपल्या मुला-मुलींशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधणे आदी विविध कारणासाठी या वाय-फाय हॉटस्पॉटचा वापर नागरिक करू लागले आहेत.शहरामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध १५० ठिकाणी वाय-फाय हॉटस्पॉट सुरु करण्यात आले. एल अ‍ॅड टी रेलटेल यांच्या सहकार्याने शहरातील निवडक उद्याने, रुग्णालये, पोलीस स्टेशन, सरकारी कार्यालये आणि संग्रहालयांच्या ठिकाणी हे ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्मार्ट सिटीच्या या मोफत वाय-फायमुळे नेट सॅव्ही तरुणाईचा उत्साह चांगला वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

विद्यार्थी या ठिकाणी बसून, ‘बाय जू’, यूट्युब सारखे मोबाईबल अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून अभ्यासासाठी अनेक मार्गदर्शक व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी वाय-फाय स्पॉटचा वापर करताना दिसत आहे. बेरोजगार तरुणांना नोकऱ्यांचे सर्फिंग करणे, नोकरीसाठी बायोडेटा, अर्ज पाठविण्यासाठी उपयोग होत आहे. तर अनेक उद्यांनामध्ये ज्येष्ठ नागरिक आपल्या परदेशातील आप्तेष्टांशी व्हिडिओ कॉल करण्यासाठी वाय-फाय स्पॉटचा वापर करू लागले आहेत.पोलीस स्टेशन व सरकारी कार्यालयांमध्ये मोफत वाय-फाय सुविधा देण्यात आल्याने दाखल गुन्ह्यांची माहिती आॅनलाईन भरणे, पासपोर्ट व्हेरिफेकशन, आॅनलाईन तक्ररी तपासणे यासाठी उपयोग होऊ लागला आहे. तिकिटांचे आॅनलाईन बुकिंग, रेल्वेचे वेळापत्रक आदी विविध कामांसाठी देखील मोफत वाय-फायचा उपयोग होऊ लागला आहे.

टॅग्स :WiFiवायफायPuneपुणे