शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येला मुख्यमंत्रीच कारणीभूत : मराठा मोर्चाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 20:44 IST

कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आत्महत्येला मुख्यमंत्रीच कारणीभूत असून मराठा आरक्षणासाठी अजून किती बळी घ्यायचे आहेत. मराठा आरक्षण देणार आहात की नाही? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

ठळक मुद्देग्रामस्थांनी शासनाकडून लेखी आश्वासन द्यावे अन्यथा अंत्यसंस्कार करणार नसल्याचा घेतला पावित्रा मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे विजय शिवतारे यांच्याकडून लेखी आश्वासन

जेजुरी : मराठा आरक्षणासाठी पुरंदरमधील पिंगोरी गावच्या तरुणाने आज रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर तालुक्यातील मराठा मोर्चाचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आत्महत्येला मुख्यमंत्रीच कारणीभूत असून मराठा आरक्षणासाठी अजून किती बळी घ्यायचे आहेत. मराठा आरक्षण देणार आहात की नाही? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. घटनेची माहिती मिळताच मराठा क्रांती मोर्चातील संदीप जगताप, प्रशांत वांढेकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, नगरसेवक गणेश जगताप, अजिंक्य देशमुख, सुरेश उबाळे, निलेश जगताप, ज्ञानोबा जाधव, भरत निगडे, राहुल शिंदे, प्रकाश शिंदे, प्रकाश पवार, हेमंत सोनवणे, दत्तात्रय बोरकर, आदींसह मराठा मोचार्चे कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याचबरोबर शासनाच्या दिरंगाईचा हा बळी असून याच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शासनाने घ्यावी. शिंदे यांच्या परिवाराला ५० लाखांची आर्थिक मदत त्वरित जाहीर करावी. त्यांची पत्नी किंवा भाऊ यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. याच प्रकारचे निवेदन मयत शिंदे यांच्या कुटुंबिय निलेश तुकाराम शिंदे, राजाराम महादेव शिंदे यांनी तहसीलदार सचिन गिरी व पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावेळी घोषणाबाजी करण्यात येत होती. पोलिसांकडून संतप्त मराठा कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात येत होते. कार्यकर्त्यांच्या भावना शासनदरबारी त्वरित कळवून शिंदे परिवाराला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असे तहसीलदार सचिन गिरी यांनी सांगितले.बारामती विभागीय अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पखाले, हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास गरुड, भोर उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, सहा.पोलीस निरीक्षक अंकुश माने, तहसीलदार सचिन गिरी, नायब तहसीलदार डी. एस. यादव आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.मयत शिंदे यांचा मृतदेह त्यांच्या पिंगोरी येथे आणला असता ग्रामस्थांनी शासनाकडून लेखी आश्वासन द्यावे अन्यथा त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा घेतला. पुरंदरचे तहसिलदार सचिन गिरी यांनी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच मृतदेहावर अंत्यसंकार करण्यात आले. परिसरातील तणावाचे वातावरण पाहून मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :PurandarपुरंदरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDeathमृत्यू