शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी चहा विकून केला निषेध, आपच्या युवा आघाडीकडून बेरोजगारीचे बारसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 03:05 IST

आम आदमी पक्षाच्या (आप) युवा आघाडीने देशातील बेरोजगारीने ४५ वर्षांतील सर्वोच्च आकडा गाठल्याचा निषेध म्हणून ‘बेरोजगारीचे बारसे’ घातले.

पुणे : आम आदमी पक्षाच्या (आप) युवा आघाडीने देशातील बेरोजगारीने ४५ वर्षांतील सर्वोच्च आकडा गाठल्याचा निषेध म्हणून ‘बेरोजगारीचे बारसे’ घातले. गुडलक चौकामध्ये झालेल्या या आंदोलनामध्ये पदवीधर तरुणांनी चहा विकून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध केला.नॅशनल सॅम्पल सर्व्हेच्या बाहेर आलेल्या आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये देशातील बेरोजगारीने ४५ वर्षांतील सर्वोच्च आकडा गाठला आहे. शहरी तरुणांच्या बेरोजगारीचा दर ६.१ टक्के झाला असून बेरोजगार महिलांची संख्याही वाढली आहे.राज्य संयोजक अजिंक्य शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. संदीप सोनवणे, सीए योगेश इंगळे, प्राजक्ता देशमुख, मुकुंद किर्दत, चेतन बेंद्रे, महेश स्वामी, पीयूष बागल, तुषार कासार, कशोर मुजुमदार, बजरंग कायगुडे, अमिरुद्दीन पटेल, निखिल देवकर, रिजवान शेख, राज अहिवळे, ओकार मोरे, शहाबाज शेख, संदीप लोखंडे, मनीष राऊत, आशुतोष शिपळकर, अक्षय कर्डिले पाटील, पैगंबर शेख, आनंद अंकुश, श्रीकांत आचार्य, निखिल खळे, वसंत घाटे उपस्थित होते. लोकायत, सिव्हिल इंजिनिअर असो., एमपीएससी स्टुडंट राईट्स, विद्यार्थी अभ्यासिका समिती आदी संघटनांनी या आंदोलनाला सहभाग घेत पाठिंबा व्यक्त केला.नोटाबंदीमुळे करोडो रोजगार गेले१ मोदी आणि फडणवीस सरकारची चुकीची धोरणं या परिस्थितीला कारणीभूत आहेत. सरकारी सेवेत हजारो पदे रिक्त असताना शिक्षकभरती व मेगाभरतीचे नुसते आश्वासन देऊन कोणतीच अंमलबजावणी केली नाही. स्किल इंडिया व मुद्रासारख्या योजनांचा फायदा युवकांना होत नाही. नोटाबंदीमुळे करोडो रोजगार गेले आहेत.२ विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर गदा आणून युवक-विद्यार्थी यांच्यावर अन्याय केला जात आहे. शिक्षणावर खर्च होत असलेले बजेट यावर्षीदेखील कमी ठेवले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये बेरोजगार युवकांसाठी कोणतीही विशेष तरतूद केली नसून त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम सातत्याने केले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

टॅग्स :Puneपुणे