शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओसाठी उंचावरून उडी मारणं जीवावर बेतलं; खडकवासला धरणात तरुणाचा करुण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 23:28 IST

पंप हाऊसच्या कठड्यावरून उडी मारल्यानंतर तरुण बुडाला

शिवणे: खडकवासला धरणातील पंप हाऊसजवळ पोहत असताना एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे. उंचावर जाऊन पाण्यात उडी मारण्याचा व्हिडिओ बनवत असताना ही घटना घडली. आशिष सुभाष फुरंगे (वय १८. रा. कर्वेनगर) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आशिष फुरंगे सायंकाळी आपल्या इतर दोन मित्रांसोबत खडकवासला धरणात पोहण्यासाठी आला होता. पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ काढण्यासाठी आशिष खडकवासला गावच्या पंप हाऊसच्या कठड्यावर चढला आणि त्याचा मित्र व्हिडिओ काढत होता. आशिषने पाण्यात उडी मारली परंतु तो वर आला नाही. मित्रांनी आरडाओरडा करून लोकांना मदतीसाठी बोलावले. परंतु कोणीही काही करू शकले नाही.सदर घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तासाठी तैनात असलेले वाहतूक पोलीस विलास बांबळे,प्रवीण ताकवले , तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आशिषचा शोध घेण्यासाठी पीएमआरडीएच्या नांदेड सिटी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन केंद्र प्रमुख सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक सोन्याबापू नागरे, अग्निशमन विमोचन किशोर काळभोर, अक्षय काळे, पंकज माळी, योगेश मायनाळे, शरद माने या जवानांनी आशिष चा मृतदेह शोधून काढला. पाण्यात उडी मारताना  पाण्यात डोक्याला मार लागून गंभीर दुखापत होऊन आशिष चा मृत्यू झाला असल्याची शक्यता उपस्थित पोलिसांनी व्यक्त केली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.