शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

दासबोधाचे हस्तलिखित तरुणांसाठी दिशादर्शक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 14:43 IST

दासबोध ग्रंथ आपण लिहावा , अशी मनापासून इच्छा होती. नव्या पिढीसाठी हस्तलिखित दिशादर्शक ठरु शकेल, अशी आशा मोहन फडणीस यांनी व्यक्त केली.  

ठळक मुद्देहस्तलिखितासाठी एकूण ७३ दिवसांचा कालावधी दासबोध, ज्ञानेश्वरीसह १० धार्मिक ग्रंथ लिहिण्याचे स्वप्ने

पुणे : ‘भक्तांचेनि साभिमाने। कृपा केली दाशरथीनें। समर्थकृपेचीं वचनें। तो हा दासबोध।’असे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथाचे वर्णन केले आहे. दासबोधातील दशके आणि समासांमधून प्रेरणा घेऊन ६५ वर्षीय मोहन फडणीस यांनी हस्तलिखित लिहिले आहे. वाचनाची आवड, आध्यात्मिक बैैठक, शिवथरघळ याठिकाणावरील श्रध्दा यातून हस्तलिखितांची प्रेरणा त्यांना मिळाली. नव्या पिढीसाठी हस्तलिखित दिशादर्शक ठरु शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना मोहन फडणीस म्हणाले, ‘दासबोध ग्रंथ आपण लिहावा , अशी मनापासून इच्छा होती. १८ जानेवारी रोजी हस्तलिखित लिहिण्यास सुरुवात केली. ३१ मार्च २०१८ रोजी दासबोध लिहून पूर्ण झाले. हस्तलिखितासाठी एकूण ७३ दिवसांचा कालावधी लागला. यामध्ये ७७५१ ओव्या असून, ११६४ लिखित पाने असून, ९१० पानांवर भावार्थ लिहिण्यात आला आहे.’दासबोधाबरोबरच ग्रंथात असलेली स्वामी समर्थ रामदासांची करुणाष्टके, मनाचे श्लोक, आरत्या या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. हस्तलिखितामध्ये जेथे जागा शिल्लक असेल तेथे समर्थांची चित्रे, श्रीराम जय राम जय जय राम असा जपही लिहिण्यात आला आहे. त्यामुळे हस्तलिखित दर्शनीय आणि वाचनीय बनले आहे. योग्य वेळी हा ग्रंथ शिवथरघळ येथे घळीत घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे. फडणीस म्हणाले, ‘हस्तलिखित लिहिताना मानसिक समाधान मिळाले. मी नेहमी शिवथरघळला जातो. तेथूनच हस्तलिखितांची प्रेरणा मिळाली. एकाने इंग्रजी भाषेमध्ये हस्तलिखित लिहिल्याचे समजले. तेव्हापासून मराठी हस्तलिखित लिहिण्याची इच्छा आणखी प्रबळ झाली.’ फडणीस यांचा पूर्वी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय होता. लहानपणापासून आईला वाचनाची सवय असल्याने फडणीस यांच्यावरही ते संस्कार झाले. अजूनही त्यांच्या घरी दासबोधाची प्रवचने होतात. त्यातून कमालीचे आत्मिक समाधान आणि शांती मिळते. आध्यात्मिक लिखाण करण्यावर त्यांचा भर आहे. शिवथरघळ येथे जाऊन किमान एक समास लिहिण्याची इच्छा आहे. दासबोधानंतर आता ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात करण्याचा मानसही फडणीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. दासबोध, ज्ञानेश्वरीसह १० धार्मिक ग्रंथ लिहिण्याचे त्यांनी ठरवले आहे. 

टॅग्स :Puneपुणे