शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: आयटी कंपनीत नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखोंचा गंडा; पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या

By प्रकाश गायकर | Updated: July 8, 2023 17:58 IST

गेल्या काही दिवसांमध्ये ७० तरुणांकडून नोकरीला लावण्याच्या बहाण्याने ५० लाख रुपये उकळले होते...

पिंपरी : आयटी कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार आरोपींच्या पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने मुसक्या आवळल्या. गेल्या काही दिवसांमध्ये ७० तरुणांकडून नोकरीला लावण्याच्या बहाण्याने ५० लाख रुपये उकळले होते. पोलिसांनी शनिवारी कारवाई करत चौघांना अटक केली. महेश कुमार हरिश्चंद्र कोळी (वय ३२, रा. सोमवार पेठ पुणे), अनोदीप चंद्रकांत पशुपती ऊर्फ शर्मा (५२, रा. वाघोली) श्रावण एकनाथ शिंदे (३२, रा. वाघोली) व एक महिला आरोपी अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी टेक्नॉलॉजी एस. ए. पी., एम. एम. व एम. के. मॅनेजमेंट सर्व्हिस नावाने महेश कुमार हा एजन्सी चालवत होता. त्यांनी विमाननगर व खराडी येथील आयटी कंपन्यांमध्ये जॉब लावण्याचे आमिष दाखवून ६० ते ७० मुला-मुलींकडून ५० लाख रुपये घेत बनावट नेमणूक पत्र देत त्यांची आर्थिक फसवणूक केली होती. यामध्ये अनुदीप शर्मा याने त्याची बनावट कंपनी बनवून त्या कंपनीचे नेमणूकपत्र दिले होते. आरोपींवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्हे शाखा ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे हे तपास करत आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखा ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलिस उपनिरीक्षक गणेश रायकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक नारायण जाधव, संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, दादा पवार, पोलिस हवालदार प्रवीण दळे, रोहिदास आडे, तुषार शेटे, पोलिस नाईक वासुदेव मुंडे यांनी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस