शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

'तुमच्या पाण्यानेचं आमची तहान भागवली', प्रवाशांची प्रतिक्रिया; पुण्यात 'ठंडा ठंडा कूल कूल' करणारी ऑटो रिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 15:34 IST

रिक्षात लायब्ररी, प्रथमोपचार पेटी, अग्निरोधक अन् बरंच काही...

शिवानी खोरगडे

पुणे : राज्यसहित पुण्यातही गरमीने अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. नागरिकांना प्रवासात उन्हाचे चटके बसू लागलेत. डोक्यावर सूर्याची तीक्ष्ण किरणं, रस्त्यावरून जाताना जाणवणारी उष्णता, या सगळ्यात कोरडा पडलेला घसा यामुळे थंडगार पाण्यासाठी जीव त्रासला आहे. अशातच एका रिक्षाचालकाने नवी शक्कल लढवली आहे. चक्क रिक्षामध्ये छोटेखानी लायब्ररी, प्रथमोपचार पेटी, पिण्याकरता मोफत पाणी, कचरापेटी, अग्निरोधक अशा सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. सिंहगड रस्त्याला राहणाऱ्या केशव गणबोटे असं या रिक्षाचालकाचे नाव आहे. 

 केशव यांना त्यांच्या ऑटोतून प्रवास न करता पायी चालत जाणाऱ्यांचेही काही अनुभव आले आहेत. ऑटोतून प्रवास करायचा नाहीये मात्र वाटेत कोणाला तहान लागली असेल तर पाण्याचा जार आणि ऑटोवर लिहिलेलं पाणी सेवा वाचून कोणी हात दाखवला तरी केशव ऑटो थांबवतात. लोकही जेव्हा केशव यांच्याशी बोलतात तेव्हा त्यांच्याशीही आपुलकीनं बोलून त्यांना मोफत पाणी सेवा देतात.

रिक्षात बसल्यावर हे सर्व पाहून मनालाही प्रसन्न वाटू लागते. या ऑटोमधील सर्व सुखसुविधा पाहून उतरवण्याची इच्छाही होत नाही. रिक्षात बसल्यावर अनेक जण मोबाईल काढून बसतात, पण या रिक्षात असणारी पुस्तके, वर्तमानपत्रे पाहून मोबाईल हातात घेण्याची इच्छाही होत नसल्याचे अनेक प्रवाशांनी त्यांना सांगितले. 

केशव गणबोटे म्हणाले, उन्हातान्हात अनेक नागरिक तहानलेले असतात. ते माझ्या रिक्षातील पाण्याचा ड्रम पाहून रिक्षाला थांबवतात. आवर्जून पाणी मागतात. नागरिकांनी पाणी प्यायल्यावर मिळालेले आशीर्वाद माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत. तुमच्या मुळे माझी तहान भागली असं कोणी म्हटल्यावर खूपच आनंद होतो. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच रिक्षाचे कौतुक करत असतात. लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मन भारावून जाते. प्रत्येकाचे अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून मी जातं करून ठेवले आहेत. प्रथमोपचार पेटीही लोकांना विशेष वाटू लागली आहे. त्यामध्ये मी जास्त प्रमाणात बेसिक औषधे ठेवली आहेत. लोंकाना चक्कर येणे, दुखणे, कणकण, ताप, सर्दी, खोकला यावरची औषधे या प्रथमोचार पेटीत ठेवली आहेत.   

ज्यूसपेक्षा तुमच्या पाण्याने आमची तहान भागवली  एका मंदिरातून देवाचे दर्शन झाल्यावर दोन व्यक्ती बाहेर आल्या. त्यांनी रस्त्यावर माझी रिक्षा पहिली. त्यावेळी लांबूनच त्यांना रिक्षात पाणी असल्याचे दिसले. ते स्वतःहून जवळ आले. आणि आम्हाला पाणी मिळेल का? अशी विचारणा केली. मी त्यांना तातडीने पाण्याचे ग्लास भरून दिले. ते म्हणाले कि, आज आमचा उपवास आहे. सकाळपासुन दोन - तीन वेळा ज्यूस प्यायलो. ज्यूस प्यायल्यावर जेवढं बर वाटलं नाही. तेवढी तहान तुमच्या पाण्याने भागवली. असा पुण्याईचा आशीर्वाद केशव यांना मिळल्याचे त्यांनी सांगितले.  

आईने मुलीला पाणी पाजण्यासाठी थांबवली रिक्षा 

मी रिक्षाने जाताना असंख्य प्रवासी कुठंतरी जाण्यासाठी रिक्षा थांबवतात. पण एका महिलेने माझ्या रिक्षावरील पाटी पाण्याचा ड्रम पाहून रिक्षा थांबवली. त्या म्हणाल्या, माझ्या मुलीला तहान लागली आहे. मला फक्त पाणी मिळू शकेल का? त्यावेळी मी कुठलाही विचार न करता त्यांना आणि त्यांच्या मुलीला पाणी दिले. त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून फारच बरं वाटले. असेही केशव यांनी सांगितले.     

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाSocial Viralसोशल व्हायरलWaterपाणीmedicineऔषधंSenior Citizenज्येष्ठ नागरिक