शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

निष्काळजीपणा भोवला ना...हरवलेल्या सिमकार्डची तक्रार न दिल्याने तरूण नायडूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 18:07 IST

निजामुद्दीन मरकजशी संबंधाच्या संशयावरून कोरोना चाचणी

ठळक मुद्देमोबाईलचे लोकेशन दिल्ली येथील तबलीगी मरकज येथील कार्यक्रमात आढळल्याने तपासणी

जुन्नर : वर्षभरापूर्वी मोबाईलच्या हरविलेल्या सिमकार्डची पोलिसांकडे तक्रार न केल्याचा निष्काळजीपणा एका तरूणाच्या चांगलाच अंगलट आला. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन दिल्ली येथील तबलीगी मरकज येथील कार्यक्रमात आढळल्याने तपासणीसाठी आरोग्य विभागाने त्याला थेट नायडू रूग्णालयात भरती केले. सुदैवाने त्याची चाचणी निगेटीव्ह आली. या नंतर त्याला घरी सोडण्यात आले. मात्र, या प्रकरणामुळे तरूण चांगलाच घाबरला आहे.  दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज प्रकरणाशी   कोणताही थेट  संबध नसताना निष्काळजीपणाने वागल्याने या युवकाला मनस्तापाला सामोरे जावे लागले.  कोरोना रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र आणि देशातील राज्य सेवा २४ तास काम करत आहेत. आरोग्य विभाग हाय अलर्टवर आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलीगी मरकज येथील कार्यक्रमात अनेक  पॉझिटीव्ह रूग्ण सापडले. या कार्यक्रमात सहभागी झालेले अनेक जण संपूर्ण देशात गेले आहेत. त्यांची शोध मोहिम सुरू आहे. पुण्यातूनही अनेक जण दिल्ली येथे जाऊन आल्याने प्रशासन त्यांचा शोध घेत आहेत.   पुण्यातील नागरिकांची प्रशासनाने यादी प्रसिद्ध केली आहे.  त्यात त्या तरूणाचा मोबाईल क्रमांक असल्याने पोलीसांनी त्याला बोलावून घेतले. तसेच तु दिल्ली येथे कार्यक्रमात असल्याने तुझी तपासणी करावी लागेल असे सांगितले. यावर तरूणाने मी दिल्लीत कधी गेलो नसल्याचे सांगितले. माझा, हा नंबर जुना असून त्याचे सीम कार्ड हरवले असल्याचे सांगितले. मात्र, पोलीसांनी त्याला पुण्यात नायडू रूग्णालयात पाठवून त्याची तपासणी करून घेतली. त्याचा अहवाल निगेटीव्ह आला.  यानंतर पोलीसांनी त्याला घरी सोडले.पोलीसांनी या सर्व प्रकरणानंतर शोध घेतला. यादीतील मोबाईल क्रमांकावर पोलीसांनी फोन केला. मात्र, संबंधित व्यक्ती फोन न उचलत असल्याने कॉल डायव्हर्ट होऊन या तरूणाला लागला. ज्याकडे या तरूणाचे सीम आहे तो  सध्या  दिल्ली येथे फोटोग्राफीचा व्यवसाय करत असल्याचे समजते. हा व्यक्ती  दिल्ली येथील  कार्यक्रमात संबधित व्यक्ती  फोटो काढण्यासाठी हा गेला असल्याचा संशय आहे. या प्रकरणामुळे तरूण आणि प्रशासकीय यंत्रणेची मात्र, चांगलीच धावपळ झाली.चौकट  निजामुद्दीन मरकज प्रकरणी शासच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या  यादीत  खोडद येथील एका युवकाचा देखील नाव असल्याचे पुढे आला आहे. शासनाने जुन्नर येथील युवकाची करोना संबधित तपासणी करून घेतली. मात्र, हा तरूण तेथे गेलाच नसल्याने, दिल्ली येथील व्यक्तीचा शोध घेऊन त्याची  तपासणी करून घेणे  गरजेचे आहे. या व्यक्तीने आपला फोन बंद करून ठेवला असल्याने त्याचा शोध घेणे यंत्रणेपुढे आव्हान ठरणार आहे. 

टॅग्स :Junnarजुन्नरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीMobileमोबाइलhospitalहॉस्पिटल