शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणाचा नीरा-देवघर धरणात बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 19:11 IST

नीरा-देवघर धरण (ता.भोर) परिसरात शुक्रवारी (दि. २६) शिंदेवाडी (ता. खंडाळा) मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.

ठळक मुद्देभोर येथील चार तरुणांनी पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह काढला बाहेर२६ जानेवारीच्या सुट्टीच्या दिवशी नीरा-देवघर धरणावर गेले होते फिरायला

नेरे : नीरा-देवघर धरण (ता.भोर) परिसरात शुक्रवारी (दि. २६) शिंदेवाडी (ता. खंडाळा) मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. भोर येथील चार तरुणांनी पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान बाहेर काढला. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज महेंद्रनाथ शर्मा (मूळ रा. तीनसुखिया ता. जिल्हा तीनसुखिया, आसाम) असे बुडालेला युवकाचे नाव आहे. त्याचे पाच मित्र २६ जानेवारीच्या सुट्टीच्या दिवशी नीरा-देवघर धरणावर फिरायला गेले होते. सर्वजण मद्यपान व पार्टी करून संध्याकाळी पाचच्या दरम्यान धरणात पोहण्यास उतरले असता पोहताना मनोज शर्मा यास दम लागून बुडून मृत्यू झाला, अशी फिर्याद भोर पोलिसात रणजीता रामेश्वर दास (रा. शिंदेवाडी) याने दिली. मनोजचा मृतदेह शनिवारी एकच्या दरम्यान भोर पोलीस व स्थानिक महेंद्र सागळे, सुनील पवार, जनार्धन सागळे, जगन शिर्के या तरुणांनी बाहेर काढला. पुढील तपास भोर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग सुतार व नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विश्वनाथ जाधव व प्रदीप नांदे करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणे