शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
4
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
5
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
6
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
9
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
10
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
11
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
12
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
14
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
15
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
16
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
17
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
18
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
19
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
20
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम

कोंढवळ धबधब्यात तरुण पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST

तळेघरर : श्री क्षेत्र भीमाशंकर अभयारण्यातील प्रसिद्ध अशा कोंढवळ येथील धबधब्यात पाय घसरल्याने पडून एक तरुण पडून ...

तळेघरर : श्री क्षेत्र भीमाशंकर अभयारण्यातील प्रसिद्ध अशा कोंढवळ येथील धबधब्यात पाय घसरल्याने पडून एक तरुण पडून बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी घडली. ग्रामस्थ व पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे, मात्र अंधार पडल्याने बचाव कार्य थांबवण्यात आले.

लक्ष्मण सोन्याबापू लहारे (वय २९, मूळ गाव राहता, जि. अहमदनगर) असे धबधब्यात पडून बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो शिक्रापूर येथील एका कंपनीत कामाला असून तो वर्षाविहारासाठी भीमाशंकर येथील कोंढवळ धबधबास्थळी आला होता. धबधब्याच्या ओढ्याला असलेल्या प्रचंड पाण्यामुळे लक्ष्मण हा वाहून गेला असून त्याचा तपास लागू शकला नाही, बाराज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर व परिसर हा अभयारण्यात आहे. सध्या या ठिकाणी पाऊस सुरू असून निसर्ग सौंदर्य बहरले आहे. पावसामुळे येथील अनेक लहान-मोठे धबधबे सुरू झाले आहेत. या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे येत असतात. यामध्ये कोंढवळ धबधबा हा नेहमीच पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजता शिक्रापूर येथून निघालेले लक्ष्मण सोन्याबापू लहारे, अजय भरत कहाणे (वय २९, रा. शिक्रापूर), रवी अशोक कदरमंडलगी (वय ३५,रा. लोणी कंद), आनंद मारुती मोहिते (वय ४५), ओमकार आनंद मोहिते (वय १३), अंकिता आनंद मोहिते (वय १५, रा. शिक्रापूर) हे मोटारीने भीमाशंकर येथे आले. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे ते दर्शनासाठी जाऊ शकले नाही. म्हणून हे सर्व वर्षाविहारासाठी भीमाशंकरजवळील कोंढवळ येथील धबधब्याकडे गेले. सकाळी ९.३० च्या सुमारास येथील मुख्य धबधब्या जवळील पाण्याजवळ लक्ष्मण सोन्याबापू लहारे गेले असता पाय घसरून पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे धबधब्याच्या खाली असलेल्या कुंडामध्ये हा जाऊन पडला. त्यानंतर त्याचा तपास लागला नाही. पोलीस पाटील सुभाष कारोटे यांनी दूरध्वनी वरून घोडेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे, सहायक फौजदार जे. आर. वाजे, पोलीस नाईक दीपक काशिद, पोलीस कर्मचारी जालिंदर रहाणे, यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. प्रशासनासोबत कोंढवळ गावचे सरपंच दीपक चिमटे, पोलीस पाटील सुभाष कारोटे व ग्रामस्थांनी शोध घेतला. परंतु बराच उशिरापर्यंत यश आले नाही.

कोट

सदर तरुणाला शोधण्यासाठी एन.डी.आर.एफ.ची टीम बोलवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

एल. जी. थाटे,

सहायक पोलीस निरीक्षक, घोडेगाव.

चौकट

या कोंढवळ धबधब्याच्या ठिकाणी २०१५ रोजी मंचर येथील एस. काॅर्नर येथील खानदेशी हा तरुण पडून मृत्युमुखी पडला होता. तोसुद्धा असाच लवकर न सापडल्यामुळे एन.डी.आर.एफ.ची टीम बोलविण्यात आली होती. त्यानंतर ह्या कोंढवळ धबधब्यावर जाण्यासाठी बंदी केली होती. वनविभागाने या ठिकाणी जाणारे रस्ते बंद केले होते. परंतु बाहेरुन आलेले पर्यटक आपला जीव धोक्यात घालून येथे जातात. पर्यटकांनी जीव धोक्यात घालून येथे येऊ नये, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

फोटो : कोंढवळ येथील धबधब्यावरील कुंडात पडलेल्या तरुणाचा शोध घेताना ग्रामस्थ व पोलीस प्रशासन.