शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जबाजारीपणाला कंटाळून तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 18:26 IST

तरूण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून पोल्ट्री शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

ठळक मुद्देपोल्ट्रीचे शेडसाठी काही स्थानिक सावकारांकडून ५ लाख रुपये घेतले होते व्याजाने

पुरंदर : पुरंदर तालुक्यातील पांगारे येथील तरूण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून पोल्ट्री शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल मंगळवारी (दि २) रात्रीच्या सुमारास घडली. दत्तात्रय माणिकराव काकडे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे.  बुधवारी (दि.३) सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी काकडे यांचे शिंदेवाडी येथे पाच हजार पक्षांचे पोल्ट्रीचे शेड आहे. त्यासाठी त्यांनी काही स्थानिक सावकारांकडून ५ लाख रुपये व्याजाने घेतले होते. संबंधित सावकाराने या पैशांसाठी काकडे यांच्याकडे तगादा लावला होता. याबाबत काकडे यांनी एका खासगी पतपेढीत कजार्साठी प्रयत्न केला. मात्र, पैशांच्या अडचणीबाबत त्यांनी मित्र परिवार किंवा कुटुंबियांनाही याची माहिती दिली नाही. सावकाराला देण्यासाठी पैशांची जमवाजमव होत नसल्याने काकडे यांनी अखेर मंगळवारी रात्री पोल्ट्री शेडमध्ये गळफास लावून आत्महत्या केली.  याबाबत राहूल नारायण काकडे यांनी सासवड पोलिस स्टेशनमध्ये माहिती दिली. सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून याबाबत सासवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.दत्तात्रय काकडे हे त्यांच्या आई वडिलांना एकुलते एक होते. त्यांचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेमुळे पांगारे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

टॅग्स :Purandarपुरंदर