शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिहारला या...आणि हवी ती माहिती घेऊन जा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 16:13 IST

पुण्यातील संजय शिरोडकर यांनी काही दिवसांपूर्वी आरटीआयअंतर्गत देशभरातील विविध राज्यांमधील टोलबाबतची माहिती मागविली आहे...

ठळक मुद्देमागील १३ वर्षांत ७ हजारांहून अधिक अर्ज ही माहिती अत्यंत सोपी आणि कार्यालयाने सहजपणे देणे शक्य एवढ्या दूर माहितीसाठी बोलाविणे म्हणजे माहिती देण्यास टाळाटाळ करण्याचाच प्रकार

पुणे : माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती द्यायची नसेल तर संबंधित कार्यालयाकडून अनेक कारणे दाखवून माहिती देण्याचे टाळले जाते. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला तर थेट बिहारला बोलावण्यात आले आहे. तुमच्या सोयीनुसार वेळ ठरवून कार्यालयात या आणि हवी ती माहिती घेऊन जा, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या बिहार राज्यातील दरभंगा येथील कार्यालयातून कळविण्यात आले आहे. पुण्यातील संजय शिरोडकर यांना हा अनुभव आला आहे. ते टोलचे अभ्यासक असून त्यांनी काही दिवसांपूर्वी आरटीआयअंतर्गत देशभरातील विविध राज्यांमधील टोलबाबतची माहिती मागविली आहे. काही राज्यांकडून त्यांना ही माहिती पाठविण्यातही आली आहे. तर काही राज्यांकडून पैसे भरण्यास सांगतिले आहे. काही राज्यांकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे दरभंगा येथे कार्यालय आहे. शिरोडकर यांनी या कार्यालयाकडूनही बिहार राज्यातील टोलची माहिती मागविली आहे. मात्र, या कार्यालयाने संबंधित माहिती मागितलेल्या तपशीलात उपलब्ध नाही. आपण दिवस निश्चित करून कार्यालयाला कळवावे. त्यानुसार कार्यालयाकडून कळविले जाईल. यादिवशी कार्यालयात येऊन माहिती घ्यावी,असे कळविले आहे. याविषयी नाराजी व्यक्त करताना शिरोडकर म्हणाले, पुणे ते दरभंगा हे अंतर जवळपास २ हजार किलोमीटर एवढे आहे. मागील १३ वर्षांत ७ हजारांहून अधिक अर्ज केले. पण अशाप्रकारे एवढ्या लांब माहिती घेण्याबाबत कोणत्याही कार्यालयाने बोलाविले नाही. पुणे किंवा मुंबई याठिकाणी बोलाविले जाते. त्यांना राज्यातील पहिला टोल कधी सुरू झाला, सध्या टोलची संख्या, मिळणारे उत्पन्न, टोलचे दर, टोलचे अहवाल अशी माहिती मागविली आहे. ही माहिती अत्यंत सोपी आणि कार्यालयाने सहजपणे देणे शक्य आहे. खरेतर ही माहिती आरटीआय अंतर्गत संकेतस्थळावरच उपलब्ध असणे अपेक्षित आहे. पण कार्यालयांकडून टाळाटाळ केली जाते. एवढ्या दूर माहितीसाठी बोलाविणे म्हणजे माहिती देण्यास टाळाटाळ करण्याचाच प्रकार आहे. 

टॅग्स :PuneपुणेRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताtollplazaटोलनाकाBiharबिहार