शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

तुम्हाला माहितीये; हवेतूनच खेचला जातो ऑक्सिजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST

विशाल शिर्के लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आपल्याला वैद्यकीय कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात आले आहे. ...

विशाल शिर्के

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आपल्याला वैद्यकीय कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात आले आहे. वातावरणातील हवा खेचून त्यातून ऑक्सिजन वेगळा काढून तो वैद्यकीय कारणासाठी वापरला जातो. रॉकेट सायन्ससारखीच अत्यंत गुंतागुंतीची जोखमीची प्रक्रिया त्यासाठी वापरली जाते.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने राज्यात वैद्यकीय कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनची मागणी सात ते आठ पट वाढली आहे. ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे परराज्यातून ऑक्सिजन मागवावे लागत आहे. देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य असूनही आपल्याला साधा ऑक्सिजन तयार करता येत नाही? ऑक्सिजन बनविणे म्हणजे रॉकेट सायन्स आहे का? असे भाबडे प्रश्नही विचारले जात आहेत. अगदी रॉकेट सायन्स नसले, तरी ऑक्सिजन बनविण्याचे तंत्र अत्यंत क्लिष्ट मानले जाते. ऑक्सिजन तयार करण्यासाठी लागणारी बहुतांश उपकरणे आयात करावी लागतात. अशी यंत्रणा हाताळण्यासाठी निष्णात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते.

—-

वातावरणात असलेल्या वायूंचे प्रमाण

आपल्या वातावरणात धूलिकण, बाष्प यांसह विविध प्रकारचे वायू असतात. नायट्रोजन (७८ टक्के), ऑक्सिजन (२०.९४ टक्के), ऑरगॉन (०.९३ टक्के), कार्बनडाय ऑक्साईड हा वातावरणातील प्रमुख वायू असून, तो वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात. त्यानंतर निऑन, हेलियम, हायड्रोजन, मिथेन, ओझोन असे काही वायू वातावरणाच्या वरच्या थरात असतात. उंच ठिकाणी ऑक्सिजन विरळ असल्याने गिर्यारोहकांना ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जावा लागतो.

——-

कसा बनवितात वैद्यकीय ऑक्सिजन

गॅस ऑक्सिजन आणि लिक्विड मेडिकल ऑक्सिजन तयार केला जातो. वैद्यकीय कारणासाठी द्रव स्वरूपात ऑक्सिजन साठविला जातो. यंत्राद्वारे वातावरणातील हवा खेचली जाते. त्यानंतर हवा तीनदा शुद्ध केली जाते. धूलिकण आणि इतर अशुद्ध भाग काढला जातो. कार्बनडाय ऑक्साईड वायू वातावरणात पुन्हा सोडला जातो. केवळ नायट्रोजन, ऑक्सिजन आणो ऑरगॉन हे तीन वायू साठविले जातात. उद्योगांमध्ये या तिन्ही वायूंची आवश्यकता असते. ऑक्सिजन द्रव स्वरूपात आणण्यासाठी उणे १८० डिग्री तापमान संतुलित घ्यावे लागते. यासाठी उच्चदाब प्रक्रिया अवलंबली जाते. असा ऑक्सिजन इस्पितळात सिलिंडरद्वारे अथवा मोठ्या टँकद्वारे पुरविला जातो. गॅस सुरू केल्यानंतर द्रव ऑक्सिजन वायू स्वरूपात बाहेर येतो.

—-

काय आहे आव्हान

एखाद्या प्रकल्पाची क्षमता शंभर टन असेल तर त्याची साठवणूक क्षमता तीनशे टन असते. तिन्ही वायूचा दाब नियंत्रित करावा लागतो. हा दाब नियंत्रित करणे आवश्यक असते, अन्यथा टाकी फुटून प्रकल्पालाही धोका पोचू शकतो. कारखान्यातील टँकमधून गाडीत ऑक्सिजन भरणे आणि गाडीतून तो खाली करणे हे काम जिकिरीचे असते. त्यासाठी चालकही प्रशिक्षित असावा लागतो. प्रकल्प हाताळण्यासाठी तांत्रिक विशेषज्ञ आवश्यक असतो.

—-

म्हणून ऑक्सिजन वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर

ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी विशेष प्रकारचे टँकर आवश्यक असतात. तसेच एक सिलिंडर मागे एक रिकामा सिलिंडर असे प्रमाण राखावे लागते. मागणी वाढल्याने आता सिलिंडरचे प्रमाण एकास तीन असे वाढविले आहे. ऑक्सिजन वाहनांच्या फेऱ्या वाढल्याने त्यांच्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करत आहे. उद्योग व वैद्यकीय मागणीनुसार सध्याचे प्रकल्प उभारले आहेत. एकूण उत्पादनाच्या ८० टक्के वापर हा औद्योगिक कारणासाठी होतो. त्यामुळे मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या शहरात ऑक्सिजनचे मोठे प्रकल्प उभारले आहेत. या कारणांमुळे प्रकल्पीय क्षमतेनुसार ऑक्सिजन करता येतो. काही कारखाने गॅस स्वरूपात ऑक्सिजन करतात तेथे द्रव स्वरूपात ऑक्सिजन करण्याची यंत्रणा उभारावी लागेल असे उद्योग सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी सांगितले.

---

ऑक्सिजननिर्मिती उद्योगांचा वीजपुरवठा अबाधित ठेवा

विविध रुग्णालये, ऑक्सिजनची निर्मिती आणि रिफिलिंग उद्योगांचा वीजपुरवठा विस्कळीत होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूची दुसरी लाट असून, हा काळ आपल्यासाठी कसोटीचा आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. काम करीत असताना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबाजावणी करावी. आरोग्याची काळजी घ्यावी. थोडी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने कोरोना चाचणी करावी. त्याचबरोबर कोरोना आणि इतर रुग्णांवर उपचार करणारी रुग्णालये, ऑक्सिजननिर्मिती उद्योगांचा वीजपुरवठा विस्कळीत होणार नाही यासाठी सज्ज रहावे. पुणे परिमंडळातील ५ हजार १६५ पैकी २३५६ कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. उर्वरित जणांनी येत्या आठवडाभरात लस घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.