शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

हो... आमचाही कुणीतरी पाठलाग करतंय! मुलींनी व्यक्त केले त्यांचे अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 04:26 IST

रात्रीची दहा-साडेदहाची वेळ... आॅफिसमधून निघायला उशीर झाल्याने बसस्टॉपवर पोहोचण्याची तिची लगबग... आॅफिसपासून बसस्टॉपला जात असताना एक तरुण पाठलाग करीत असल्याचे तिच्या लक्षात आले...

पुणे : रात्रीची दहा-साडेदहाची वेळ... आॅफिसमधून निघायला उशीर झाल्याने बसस्टॉपवर पोहोचण्याची तिची लगबग... आॅफिसपासून बसस्टॉपला जात असताना एक तरुण पाठलाग करीत असल्याचे तिच्या लक्षात आले... तिची पावले वेगाने पडू लागली... बसची वाट पाहत उभी असताना तो पुन्हा तिच्या बाजूला येऊन उभा राहिला... काही वेळ उलटल्यावर त्याने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली... ती घाबरून मदतीच्या आशेने आजूबाजूला पाहत असतानाच त्याने चक्क तिच्यासमोर हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली... काय करावे हे तिला कळेना... रस्ता ओलांडून एका रिक्षाला हात करुन तिने तिथून पळ काढला. सीएसटी स्टेशनवर रेल्वेमध्ये तरुणींसमोर बसून तरुणाने केलेले हस्तमैथुन, पोलिसांनी त्याबाबत दाखवलेली उदासीनता, मुंबईतील तरुणीचा घरापर्यंत पाठलाग केल्याच्या घटनेला आठवडा उलटत नाही तोच गुरुवारी मध्यरात्री कामाहून घरी परतणाºया एका २५ वर्षांच्या तरुणीचा दोन मोटरसायकलस्वार तरुणांनी केलेला पाठलाग अशा अनेक घटना नव्याने समोर येत आहेत.या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये नोकरदार महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक महिला, तरुणींशी संवाद साधला असता, बºयाचदा अशा प्रसंगाना निमूटपणे सामोरे जावे लागत असल्याची भावना त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. याबाबत पोलिसांची मदत घेण्याबरोबरच तरुणींनी धाडसी होऊन स्वसंरक्षणासाठी सज्ज व्हायला हवे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.अनुभव १ : रस्त्यावरून एकटीच चालले होते. एक मुलगा मागून गाडीवरून शेजारी येऊन थांबला. मी या परिसरात नवीन राहायला आलो आहे. एकटाच असतो, कोणी कामवाली बाई असतील तर मिळवून द्या. मग एकदमच तू काय करतेस वगैरे अशी त्याची भाषा सुरू झाली. मी स्वत:च घरकाम करते म्हटले तुमचा नंबर द्या, आईला विचारून सांगते. त्या इथेच राहातात का? असे विचारल्यावर मी नाही म्हटले. उगाचच काहीतरी बोलत होता. त्याचा हेतू चांगला नाही हे समजल्यावर मी पुढे चालू लागले तर तो मागे आला बाईकवरून सोडू का? असे विचारायला लागला. मी ‘नो थँक्स’ म्हणून एका सोसायटीमध्ये शिरले आणि दुस-या सोसायटीच्या गेटने बाहेर पडले.- राजश्री, शिक्षिकाअनुभव २ : रात्री शास्त्री रस्त्याच्या बाजूने दांडेकर पूलावरून मुलगी आणि मी आम्ही दोघी घरी जात होतो. तिथून दोन मुलांनी आमचा पाठलाग सुरू केला. आमच्या बाजूने येऊन दोघेही अर्वाच्य अश्लील भाषेत बोलत होते. आम्ही मित्रमंडळ चौकात गाडी घातली, मात्र तिथे पुढे जाऊन ते थांबले होते. ते काही केल्या आमचा पिच्छा सोडत नव्हते. पोलिसांनाच फोन करू असे मुलगी म्हटली. चुकामुक झाली आणि आम्ही कशातरी घरात पोहोचलो. इतक्या घाबरलो होतो की आम्हाला काही सुधरतच नव्हते. - माधुरी, गृहिणीअनुभव ३ : काही दिवसांपूर्वीच एक प्रसंग माझ्याबाबतीत घडला होता. त्या व्यक्तीने माझा खूप वेळ पाठलाग केला बोलला काही नाही पण मला याची भीती वाटत होती की तो जर काही बोलला तर मी काय बोलू त्यावेळी मी खूप घाबरले होते मात्र तसे न दाखवता मी त्याकडे दुर्लक्ष केले. भीत भीत घरी आले. नंतर मीच रस्ता बददला. - दिपा चव्हाण, नोकरदार महिला