शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

होय, आमचा गणपती नवसाचाच! हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचा स्पष्ट उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 11:57 IST

‘नवसाचा गणपती’ असा उल्लेख आतापर्यंत छातीठोकपणे करता येत होता. परंतु, आता हा उल्लेख कायदेशीररीत्या अडचणीचा ठरू शकतो.

ठळक मुद्देनव्या नियमामुळे धास्ती :

 नीलेश राऊत- 

पुणे : ‘नवसाला पावणारा देव,’ असे म्हणण्याची बंदी नव्या कायद्याने घातली आहे. तरीही पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा गणपती ‘नवसाचा गणपती’ म्हणूनच ओळखला जात आहे. कायदेभंग होण्याची धास्ती या मंडळाला नसल्याने त्यांनी त्यांच्या वार्षिक अहवालावरही ‘नवसाचा गणपती’ असा उल्लेख ठळकपणे केला आहे. ‘नवसाच्या’ या गणपतीची कथा रंजक आहे. या मंडळाच्या गणेशमूर्तीचे काम चालू होते. धडापर्यंत मूर्ती तयार झाली आणि त्याचवेळी मूर्तिकाराचा अकाली मृत्यू झाला़. मग, प्रश्न असा निर्माण झाला, की उर्वरित मूर्तीचे काम पूर्ण होणार की नाही? मंडळाचे कार्यकर्ते चिंतेत पडले. ही गोष्ट आहे सन ४८ वर्षांपूर्वीची. त्यावेळी मूर्ती पूर्ण व्हावी, असा नवस त्यावेळचे कार्यकर्ते बोलले. काही दिवसांतच मंडळाला हवी तशी मूर्ती साकार झाली. म्हणून गणपतीचे नावच झाले ते ‘नवसाचा गणपती.’‘नवसाचा गणपती’ असा उल्लेख आतापर्यंत छातीठोकपणे करता येत होता. परंतु, आता हा उल्लेख कायदेशीररीत्या अडचणीचा ठरू शकतो. यासंदर्भात हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे ‘लोकमत’ने विचारणा केली. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, ‘‘कर्तृत्वाला परमेश्वराची जोड हे आमचे ब्रीद आहे. आम्ही कुठेही अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही. आमच्या गणपतीला नवस करा आणि फेडण्यास या, असे आम्ही कधीही कोणाला सांगत नाही़ ‘हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचा नवसाचा गणपती’ या नावानेच आमच्या मंडळाची नोंदणी शासनदरबारी सन २००४ मध्ये झालेली आहे.’’मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि कार्याध्यक्ष किशोर दाभाडे म्हणाले, की सन १९७० मध्ये मंडळाची स्थापना झाली़ त्यावेळी प्रारंभीची दोन वर्षे नवीन मूर्ती स्थापन केली जात होती़. ही मूर्तिकार खेडेकर यांनी ती तयार केली होती.परंतु ती जड असल्याने, १९७३ मध्ये मंडळाने कायमस्वरूपी दुसरी मूर्ती तयार करण्याचे ठरविले़. त्या काळी सातशे रुपयांची वर्गणी हातात असताना आम्ही एकवीसशे रुपयांची मूर्ती साकारण्याचा संकल्प केला़. मूर्तिकार अनंतराव वाईकरांकडून ही मूर्ती साकारण्यास सुरुवात झाली़. पण धडापर्यंत मूर्ती तयार झाली आणि वाईकर यांचे अकाली निधन झाले़. मूर्तीचे पुढचे काम पूर्ण व्हावे, यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणरायालाच मूर्ती साकार होण्याकरिता नवस केला होता़. पुढे मूर्तिकार प्रकाश गोसावी यांनी अवघ्या काही दिवसांतच अपूर्ण मूर्तीचे मुख साकारले आणि आमच्या मनातील मूर्ती पूर्णत्व:ला आली़. त्या अर्थाने आम्हा कार्यकर्त्यांच्या नवसाचा हा गणपती असल्याने गणपतीचे नावच ‘नवसाचा गणपती’ आहे. आम्ही तसे म्हणतो आणि म्हणणारच़. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवMaharashtra Andhashraddha Nirmulan Samitiमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीCourtन्यायालय