शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यात तरुणाचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 04:10 IST

मावशी व बहिणीसह तो येरवड्यात राहत होता. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तो घरी आला. कामानिमित्त बाहेर जातो म्हणून तो पुन्हा बाहेर गेला.

विमाननगर : येरवडा येथील कॉमर झोनच्या समोरील मनोरुग्णालयाच्या मैदानावर बुधवारी पहाटे एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़निखिल श्रीकांत कडाळे (वय २५, रा़ पंचशीलनगर, येरवडा) असे या तरुणाचे नाव आहे़ हा प्रकार बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी त्याचे शेजारी राजेश जगताप यांनी फिर्याद दिली आहे़ याबाबत पोलिसांनी सांगितले, की कॉमर झोन आयटी पार्कसमोरील मनोरुग्णालयाच्या मैदानावर एका तरुणाचा खून झाल्याची माहिती सकाळी ८ च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाकडून येरवडा पोलिसांनी मिळाली़ एका युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला होता़ पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता पंचशीलनगर येथे राहणारा निखिल कडाळे याचा तो मृतदेह असल्याची माहिती मिळाली़मावशी व बहिणीसह तो येरवड्यात राहत होता. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तो घरी आला. कामानिमित्त बाहेर जातो म्हणून तो पुन्हा बाहेर गेला. सकाळी घराजवळील मैदानात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून झाल्याची माहिती पोलिसांकडून त्याच्या कुटुंबीयांना मिळाली. उपायुक्त दीपक साकोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली़

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे