शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा रुग्णालयातील दोन जणांचे पुणे जिल्हा विधी सेवेकडून पुनर्वसन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 19:33 IST

ते सध्या पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावरील एका हॉटेलमध्ये काम करीत आहेत. 

ठळक मुद्देदोन वेळचे जेवण आणि आठ हजारांचा भत्ता त्यांना मिळतो रुग्णांना बरे झाल्यानंतर प्रमाणपत्र पालकत्व स्विकारणा-या व्यक्तीकडून करारपत्र घेतल्यानंतर त्यांच्या स्वाधीन

पुणे :  अनेकदा मानसिक आजारातून पूर्णपणे सावरल्यानंतर देखील त्या व्यक्तींना रोजगार मिळविण्याकरिता अडचणींचा सामना करावा लागतो.  कुठलाही प्रकारचे काम मिळण्यास समस्या येतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून येरवडा रुग्णालयात असलेल्या दोन जणांचे पुनर्वसन करण्यात पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला यश आले आहे. ते सध्या पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्गावरील एका हॉटेलमध्ये काम करीत आहेत. मनोरुग्णालयात नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांना हॉटेल चालकाकडे सोपविण्यात आले. दोन वेळचे जेवण आणि 8 हजार रुपये असा मासिक भत्ता त्यांना देण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी ए. डी. पळसपगार, प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत आणि मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यावेळी उपस्थित होते. उपचारातून बरे झालेल्या 25 व्यक्ती मनोरुग्णालयात आहेत. मात्र या त्या ब-या झाल्यानंतर त्यांना पुन्हा घरी घेवून जावे लागू नये म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी खोटे पत्ते दिले आहेत. तर ज्या कुटुंबीयांना फोन करण्यात आले ते एकतर फोन घेत नाहीत किंवा नंबर चुकीचा असल्याचे सांगतात. त्यामुळे या व्यक्ती ब-या झाल्यानंतर देखील अनेक वर्ष याच ठिकाणी आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राधिकरणाने पुढाकार घेतला असून त्यातील दोघांना नोकरी देण्यात आली आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.  रुग्णांना बरे झाल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यांचे पालकत्व स्वीकारण्यास तयार असलेल्या व्यक्तींकडे त्यांना सुपूर्त करण्याबाबत न्यायालय आदेश देते. त्यानंतर पालकत्व स्विकारणा-या व्यक्तीकडून करारपत्र घेतल्यानंतर त्यांच्या स्वाधीन करण्यात येते. नोकरी करीत असताना त्यांना काही त्रास झाल्यास मदत करण्याच्या सूचना संबंधित पोलिस ठाण्यास देण्यात आल्या आहेत. तसेच गरज पडल्यास त्यांच्यावर पुन्हा उपचार करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी अँड. अतुल गुंजाळ आणि अँड. मिलिंद पवार यांनी मदत केली. 

टॅग्स :Puneपुणेyerwada mental hospitalयेरवडा मनोरुग्णालय