शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ साहित्य संमेलन : नयनतारा सहगल करणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 02:33 IST

यवतमाळ येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते ११ जानेवारी दुपारी ४ वाजता यवतमाळ येथील पोस्टल ग्राऊंड, समता मैैदान येथे होत आहे.

पुणे : यवतमाळ येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते ११ जानेवारी दुपारी ४ वाजता यवतमाळ येथील पोस्टल ग्राऊंड, समता मैैदान येथे होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. परिसंवाद, कवी संमेलन, मुलाखत, ललित गद्यानुभव, गदिमांवर विशेष कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची संमेलनात रेलचेल असेल.नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली ११ ते १३ जानेवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. ढेरे यांच्यासह संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, स्वागताध्यक्ष, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांचीही उपस्थिती असेल. संमेलनाचा समारोप केंद्रीय रस्ते आणि जल वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर उपस्थित राहतील.तीन दिवसीय संमेलनात चार परिसंवाद, एक कवीसंमेलन, कवितावाचन, वºहाडी बोली कवींचे स्वतंत्र कवी संमेलन, टॉक शो, प्रकट मुलाखत, चर्चा, तांड्यांच्या पोडांच्या कथा-व्यथा, अनुभवकथन, मान्यवरांचा सत्कार, गदिमांच्या कार्यकर्तुत्वावरील विशेष सांगीतिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथप्रदर्शन, प्रकाशन मंच, कवीकट्टा अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.‘प्राचार्य राम शेवाळकर विचारपीठ’संमेलन परिसराला ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी’ असे नाव देण्यात आले आहे. मुख्य मंडपाला ‘शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर’ तर बचत भवन येथील कार्यक्रम स्थळाला ‘डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे. मुख्य मंडपातील व्यासपीठाला ‘प्राचार्य राम शेवाळकर विचारपीठ’ असे नाव देण्यात आले आहे.उद्घाटनापूर्वी ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता आझाद मैैदानावरुन ग्रंथदिंडी निघून संमेलन स्थळापर्यंत जाणार आहे. या ग्रंथदिंडीमध्ये शेतकऱ्यांची बैैलबंडी, गुरुकुंज मोझरीचे भजन मंडळ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे चित्र, कलशधारी मुली, संतांच्या वेशातील मुले, मुली असतील. बंजारा, तिज, लेंगी, आदिवासी लोकनृत्य पथक, दंडार पथक, लेझीम पथक, साहित्यिकांचे दर्शन अशा विविध बाबींचा समावेश असेल.

टॅग्स :marathiमराठी