शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

यवतला चोरट्यांचा धुमाकूळ, दोन घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 02:36 IST

गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरश: थैमान घातले. मात्र, नागरिकांच्या जागरूकतेमुळे चोरलेल्या दोन दुचाकी तेथेच सोडून चोरांना पाय काढावा लागला.

यवत : गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरश: थैमान घातले. मात्र, नागरिकांच्या जागरूकतेमुळे चोरलेल्या दोन दुचाकी तेथेच सोडून चोरांना पाय काढावा लागला.यवत येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सहकारनगर भागात चोरांनी थैमान घातले. भाजपाच्या महिला उपाध्यक्षा मंगल किरण खेडेकर यांच्या घराचे शटर उचकटून चोरांनी तेथे चोरीचा प्रयत्न केला. मात्र, खेडेकर यांच्या मुलीचे लग्न दोनच दिवसांपूर्वी झालेले असल्याने त्यांच्या घरात जास्त पै-पाहुणे मुक्कामी होते. शटर उचकटल्यानंतर आतमधील लोकांनी विरोध करताच चोरांनी त्यांच्या हातातील तोडलेली कुलुपे त्यांना मारून तेथून पळ काढला. या वेळी खेडेकर यांच्या जावयाच्या पायाला कुलूप लागून मार बसला. चोरांनी तेथून पळ काढला. मात्र, जवळच रामा कोळी यांच्या भाड्याने दिलेल्या खोलीतील एकाचा मोबाईल व खोटे दागिने चोरांनी लंपास केले.यवत विश्रामगृहानजीक देखील दोरगे यांच्या घराजवळील नागरिकांच्या घराच्या कड्या बाहेरून लावून चोर एक दुचाकी पळवत होते. मात्र अचानक कोणीतरी आल्याने दुचाकी तेथेच सोडून त्यांनी पळ काढला. यवत गावठाणात सुतारवाडा येथे राहणारे राजेंद्र विजय गुजर यांची व इतर एकाची अशा दोन दुचाकी चोरांनी लॉक तोडून ढकलत चालविल्या होत्या. मात्र, त्या वेळी तेथे गावातील संदीप उत्तम गायकवाड, बापू शेंडगे व एक जण आले असता त्यांना चोरटे असल्याचे जाणवल्याने त्यांनी त्यांना हटकले. यामुळे दोन्ही दुचाकी तेथेच सोडून चोरांनी पळ काढला. मात्र त्या वेळी चोरांच्या हातात कोयते असल्याने गावातील युवकांनी त्यांचा पाठलाग करायचे टाळले. एकंदरीत काल रात्री चोरांनी गावात धुमाकूळ घातला असताना नागरिकांनी जागरूकता दाखवल्याने तीन दुचाकी चोरीला जाता जाता वाचल्या. मात्र, कालच्या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैदयवत ग्रामपंचायतीने नुकत्याच बसविलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेत गावात चोरटे दिसत आहेत. मात्र चोरांनी तोंडे बांधलेली असल्याने त्यांचे चेहरे मात्र दिसत नाहीत. आता चोरांची दहशत पोलीस संपविणार तरी कसे, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे. माजी उपसरपंच समीर दोरगे यांनी गावातील चोºया थांबण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाPuneपुणे