शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

तज्ज्ञांअभावी चुकीचे धोरणात्मक निर्णय : भालचंद्र मुणगेकर; टिमवित आंतरराष्ट्रीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:44 IST

मोदी सरकारने नियोजन आयोगच बरखास्त केला. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना तज्ज्ञांची मदत मिळत नाही. परिणामी हे निर्णय चुकत असून राष्ट्रीय उत्पन्नात घट होत असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘आधुनिक तंत्रज्ञान आणि रोजगार क्षमता : भविष्यकालीन दृष्टीकोन’ या विषयावर परिषदसध्या निर्माण झाला रोजगाराचा प्रश्न, गुणवत्ता तपासणे हेही गरजेचे : मुणगेकर

पुणे : नियोजन आयोग स्थापन करण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी २९ वर्ष लढा दिला. पण मोदी सरकारने हा आयोगच बरखास्त केला. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेताना तज्ज्ञांची मदत मिळत नाही. परिणामी हे निर्णय चुकत असून राष्ट्रीय उत्पन्नात घट होत असल्याचे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘आधुनिक तंत्रज्ञान आणि रोजगार क्षमता : भविष्यकालीन दृष्टीकोन’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक, उपकुलगुरु डॉ. गीताली टिळक-मोने, विद्यापीठाच्या प्रशासकीय सल्लागार डॉ. प्रणती टिळक, कुलसचिव अभिजीत जोशी, संचालक अजित खाडीलकर उपस्थित होते.   मुणगेकर म्हणाले, जागतिक मंदी असताना नियोजन आयोगाने सूचविलेल्या आर्थिक बाबींमुळे राष्ट्रीय उत्पन्न ८ टक्क्यांच्या जवळ होते. त्यामुळे भारताला मंदीची फारशी झळ पोहोचली नाही. सध्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार उपलब्ध करून देताना त्याची विश्वासार्हता, स्थिरता, मिळणारे फायदे या सर्वांचा विचार करणे आवश्यक आहे. बांधकाम, आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये रोजगार वाढत आहेत. मात्र या रोजगाराची गुणवत्ता तपासणे हेही तितकेच गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान वाढत असताना अनेक जुने रोजगार बंद होत आहेत. सरकारने ३० टक्के सरकारी नोकऱ्या कमी करण्याचे धोरण आखले आहे. तेव्हा या तरुणांनी करायचे काय असा प्रश्न निर्माण झाल्याचे डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित जोशी यांनी केले. डॉ. प्राजक्ती बाकरे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Puneपुणे