शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सखींनो, 'त्या' पाच दिवसांबद्दल बिनधास्त लिहा! 'समाजबंध' चा पुढाकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:19 IST

मासिक पाळीबद्दल अद्यापही खुलेपणाने बोलले जात नाही...

ठळक मुद्देमासिक पाळीच्या अनुभव लेखन स्पर्धेतून साकारणार ई-बुकपरिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जाणारअनुभवांना मोकळी वाट करून देण्यासाठी हा उपक्रम हाती

पुणे : आपल्यासारखाच एक जीव निर्माण करण्याची निसर्गदत्त देणगी असलेली 'मासिक पाळी' कधीकधी नकोशी वाटते. प्रसंगी अडचणींवर मात केली तरी अडथळ्यांच्या शर्यतीत 'पाळी' मात्र कायम लक्षात राहते. ही नैसर्गिक प्रक्रिया आपल्याला नकोशी वाटू लागते. असा एकतरी अनुभव प्रत्येकीला कधी ना कधी आलेला असतो. मात्र, 'लोक काय म्हणतील' या भीतीने आपण त्याबद्दल कधीच बोलत नाही. मात्र, हे अनुभव शब्दबद्ध व्हावेत यासाठी 'समाजबंध' संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी अनुभव लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यांचे ई-बुक प्रसिद्ध केले जाणार आहे.मासिक पाळीबद्दल अद्यापही खुलेपणाने बोलले जात नाही. परंपरागत चालत आलेल्या अनेक गैरसमजांमुळे मुलगी वयात येण्याच्या आधीपासूनच तिच्या मनात मासिक पाळीची भीती बसते. मुलींना, महिलांना या काळात शारीरिक आणि मानसिक वेदना सहन कराव्या लागतात.समाजबंध संस्थेच्या माध्यमातून सचिन आशा सुभाष यांनी 'प पाळीचा' या उपक्रमाअंतर्गत जनजागृती करण्याचा वसा घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून मासिक पाळी या विषयावर अनुभव लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अनुभवांवर आधारित एक अहवालही तयार केला जाणार असून, परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या जाणार आहेत.सचिन आशा सुभाष यांनी 'लोकमत'ला सांगितले, 'कधी सोबत पॅड नसताना पाळी येते, कधी अनपेक्षितपणे प्रवासात पाळी येते, ऐन परीक्षांमध्ये, ऑफिसमध्ये असताना तर कधी घरी काही 'कार्य' असताना पाळी येते. आणि मग सुरू होते महिलांच्या जीवाची घालमेल, 'अच्छे दाग' लपवण्याची धडपड, आराम मिळवण्याची, बाथरूम शोधण्याची धावपळ आणि पॅड मिळवण्यासाठी आणि बदलण्यासाठीची कसरत. कधी जवळ पॅडच नसते, कधी पॅड बदलायला जागा नसते, कधी नाईलाजाने अतिगलिच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागतो तर कधी घरातील कार्यात 'विघ्न' नको म्हणून आपल्यालाच दूर केलं जातं किंवा पाळीच दूर लोटली जाते. असे अनेक अनुभव अनेकांच्या गाठीशी असतात. याच अनुभवांना मोकळी वाट करून देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.'अनुभव लिहिण्यासाठी कोणतीही शब्दमर्यादा नाही. आपल्या सोयीनुसार कोणत्याही भाषेत लिहिता येणार आहे. आपला अनुभव टाईप करून samajbandhindia@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा  7709488286 यावर व्हॉटसअपद्वारे ३१ मे पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला