शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर रस्त्यावरील सायकल ट्रॅकची बिकट ‘वाट’; पदपथावरून चालताना पादचारीही त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 13:57 IST

सोलापूर रस्त्यावर पुलगेट ते हडपसरदरम्यान सायकल ट्रॅक आणि पदपथ उभारणीच्या कामाला एक दशकाहून अधिक कालावधी लोटला, तरी अजून काम सुरूच आहे.  अवघा एक किलोमीटरसुद्धा बीआरटी मार्ग पूर्ण दिसून येत नाही.

ठळक मुद्देदहा वर्षांपासून सुरू शहर आणि परिसरात सायकल ट्रॅक उभारणीचे काम सोलापूर आणि सासवड हे मार्ग ओलांडताना चालावे लागते जीव मुठीत धरून

हडपसर  : सोलापूर रस्त्यावर पुलगेट ते हडपसरदरम्यान सायकल ट्रॅक आणि पदपथ उभारणीच्या कामाला एक दशकाहून अधिक कालावधी लोटला, तरी अजून काम सुरूच आहे.  अवघा एक किलोमीटरसुद्धा बीआरटी मार्ग पूर्ण दिसून येत नाही. त्यामुळे सायकल चालवताना आणि पदपथावरून चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. बीआरटी मार्गामुळे वाहतुकीचा रस्ता कमी झाल्याने शहर आणि परिसरात सायकल ट्रॅक उभारणीचे काम दहा वर्षांपासून सुरू आहे. त्या वेळी महापौर, आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांनीही ‘सायकल वापरा प्रदूषण टाळा’चा नारा  देत सायकल चालवली होती. महापालिकेनेही प्रायोगिक तत्त्वावर सायकली भाड्याने देण्याचे नियोजन केले होते; परंतु नंतर सायकल ट्रॅकचा बोजवारा उडाला. शहरातील एकही सायकल ट्रॅक व्यवस्थित केलेला नाही. त्यात अनेक अडथळे आहेत. ज्या ठिकाणी सायकल ट्रॅक उभारला गेला आहे, त्याच्यावर अतिक्रमणे झालेली आहेत. ती हटविण्याचे धाडस पालिका प्रशासन करीत नाही, कारण स्थानिक लोकप्रतिनिधींचे त्यामध्ये हितसंबंध  गुंतलेले आहेत. पदपथही कुठे शिल्लक दिसत नाहीत. त्यावरही अतिक्रमणे झालेली आहेत. फेरीवाले आणि दुकानदारांसाठीच सायकल ट्रॅक आणि पदपथ उभारले आहेत की काय, अशीच भावना नागरिकांमध्ये आहे. सासवड रस्त्यावर काही वर्षांपूर्वी सायकल ट्रॅक उभारला, त्याच्या उद्घाटनाप्रसंगी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सायकल चालवून या कामाचे कौतुक केले होते. पण आता वाहनांच्या गर्दीत सायकली हरवल्या आहेत. 

सायकलवर विद्यार्थी दिसतो क्वचितच दहा-पंधरा वर्षांपूर्वी हडपसर आणि परिसरातील शाळकरी मुले सायकलवरून शाळेत जात होती, त्या वेळी वाहनांची गर्दी कमी होती.  मात्र, शहरीकरणाबरोबर नागरिकरणही झपाट्याने वाढत आहे. उंच-उंच इमारती उभ्या राहत आहेत. शहरवासी उपनगर आणि परिसरात सदनिका घेऊन राहू लागले आहेत. त्यामुळे सोलापूर आणि सासवड हे मार्ग ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागते. 

ट्रॅकचा खर्च वाया वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न, धुरांचे लोट यामुळे श्वसनाचे आणि फुफ्फुसाचे आजार वाढत आहेत. सायकल ट्रॅक बनविण्यासाठी खर्च केलेली रक्कम किती होती आणि किती खर्च केली, याचा लेखाजोखा प्रशासनाने जाहीर करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Puneपुणे