शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

नेमका पाणीवापर सांगणारे जगातील सर्वोत्तम मीटर पुण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:13 IST

पुणे - पाणी हे मौल्यवान आहे आणि म्हणूनच त्याचा जपून आणि आवश्यक तेवढाच वापर होणे आवश्यक असते. ही बाब ...

पुणे -

पाणी हे मौल्यवान आहे आणि म्हणूनच त्याचा जपून आणि आवश्यक तेवढाच वापर होणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन पुणे महापालिकेने २४ तास पाणीपुरवठ्याची योजना आखली असून, त्याअंतर्गत जलतंत्रज्ञानातील जगातील सर्वोत्तम कंपन्यांपैकी असणाऱ्या 'झायलेम' या कंपनीचे 'सेन्सस आय-पर्ल' हे अत्याधुनिक वॉटर मीटर अल्पावधीतच पुणेकरांच्या घरांमध्ये बसणार आहेत. मीटरपद्धतीने पाणी पुरवण्याच्या योजनेमुळे नागरिक जेवढे पाणी वापरतील, तेवढेच शुल्क त्यांच्याकडून आकारले जाईल.

पाणीपुरवठ्या दरम्यान होणारा अपव्यय व चोरी रोखून जेवढा पाण्याचा वापर तेवढेच शुल्क भरायला लागावे, हे यामागील उद्दिष्ट असल्याने नागरिकांच्या दृष्टीने ही योजना फायदेशीर ठरणार आहे. केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटीज मिशन' अंतर्गत भविष्यातील पाणीपुरठ्याचे नियोजन करीत अशा प्रकारचे अत्याधुनिक पाणी मीटर बसविणारे पुणे हे देशातील पहिले शहर असल्याचा दावा 'झायलेम सेन्सस कंपनी'ने केला आहे. विशेष म्हणजे, लंडन येथे सुरू असलेल्या 'द थेम्स स्मार्ट मीटरिंग प्रोग्राम'मधील अनुभवाचा वापर 'सेन्सस'तर्फे पुण्यात करण्यात येणार आहे. येत्या २०४० पर्यंत लंडन शहर व उपनगरांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता लंडनला पाणीपुरवठा करणाऱ्या थेम्स वॉटरने ३० लाखांहून अधिक स्मार्ट वॉटर मीटर बसविण्याचा उपक्रम हाती घेतला असून, यातील बहुतांश मीटर्स 'सेन्सस'तर्फे बसविण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेतर्फे एकूण ३,१८,००० मीटर्स बसविण्यात येणार असून, त्यातील २,७५,००० मीटर्सचा पुरवठा 'सेन्सस'तर्फे करण्यात येणार आहे.

तंत्रज्ञानाच्या आधारे संपूर्ण पाणीपुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेतर्फे 'स्काडा' प्रणालीचाही वापर करण्यात येणार असून, याच प्रणालीद्वारे प्रत्येक मीटरवरही लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. पाण्याच्या दाबातील चढ-उतारांतही व्यवस्थित काम करण्याची क्षमता असणारे 'सेन्सस आय-पर्ल मीटर' पाण्याची गळती रोखण्यातही सक्षम आहे. पाणीगळतीसह पाण्याचा उलटा प्रवाह, मीटरशी छेडछाड इत्यादींबाबतच्या सूचनाही या मीटरद्वारे मिळू शकतात. पुण्यात बसविल्या जाणाऱ्या मीटर्सची बॅटरी दीर्घकाळ टिकणारी असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

यापूर्वी २००१ च्या सुमारास महापालिकेने आखलेली मेकॅनिकल वॉटर मीटर बसविण्याची योजना सदोष मीटरमुळे रद्द करण्यात आली होती. नव्या अत्याधुनिक मीटर्समध्ये शून्य मानवी हस्तक्षेप असून, पाण्याचा वापर आणि बिल यांचीही अचूक माहिती ग्राहक व महापालिकेला तत्काळ मिळू शकणार आहे.

चौकटः

जेवढा वापर, तेवढेच शुल्क

पुणे महापालिकेतर्फे दररोज दरडोई साधारण ३०० लिटर पाणीपुरवठा केला जातो. यातील ४० टक्के पाण्याचा गळती व चोरीमुळे अपव्यय होतो. सद्यःस्थितीत महापालिकेतर्फे वार्षिक मिळकत करासोबत पाण्याचे शुल्क आकारले जाते. हे शुल्क दोन ते चार हजार रुपयांच्या दरम्यान असते. मीटर बसविल्यानंतर दररोज दरडोई १४० ते १८० लिटर पाणी वापरले जाईल. परिणामी तेवढ्याच पाण्याचे शुल्क नागरिकांना भरावे लागेल. सध्याच्या वार्षिक मिळकत करातून पाण्याचे शुल्क वजा होईल व ते दरमहा सव्वाशे रुपये, अर्थात वर्षाला दीड हजार रुपयांच्या दरम्यान असेल, असे अनुमान आहे.

कोटः

शहर स्मार्ट करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, कार्यक्षम सुविधा पुरविणे आणि नागरिकांचे जीवन सुखद करणे, हाच दृष्टिकोन ठेवून पुणे महापालिका दीर्घकालीन टप्प्याचे प्रकल्प राबवीत आहे. २०४७ पर्यंतचे पुणे शहराचे हित लक्षात घेऊन २४ तास पाणीपुरवठ्याची योजना राबविली जात आहे.

- मुरलीधर मोहोळ, महापौर