शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक रंगभूमी दिन विशेष ; पडद्यामागील कलाकारांसाठी प्रयोगशील नाटय कलावंतांचा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 10:00 IST

करोना विषाणूच्या संकटामुळे हातावरचे पोट असलेल्या  पडद्यामागच्या कलाकारांवर बेरोजगारीची  कुऱ्हाड कोसळली असताना त्यांच्या मदतीसाठी  पुण्यातील प्रयोगशील नाटय कलावंत मंडळी पुढे सरसावले आहेत.

पुणे ; करोना विषाणूच्या संकटामुळे हातावरचे पोट असलेल्या  पडद्यामागच्या कलाकारांवर बेरोजगारीची  कुऱ्हाड कोसळली असताना त्यांच्या मदतीसाठी  पुण्यातील प्रयोगशील नाटय कलावंत मंडळी पुढे सरसावले आहेत. नाट्य संस्था आणि प्रयोगशील कलाकारांनी एकमेकांशी संपर्क करून दोन दिवसात दीड लाख रुपयांचा निधी उभा केला आहे. उद्या (27 मार्च) रंगभूमी सेवक संघाच्या माध्यमातून ४१ बॅकस्टेज कलाकारांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. 

   पडद्यामागच्या कलाकारांना किमान एक महिन्याचा किराणा माल विकत घेता यावा आणि कोणी उपाशी राहू नये, अशी रंगभूमीवरील कलाकारांची तळमळीची भावना आहे. 'पडद्यामागील कलाकारांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हाल होऊ नयेत, ही काळजी घेणे आम्हा कलावंतांचे कर्तव्य आहे. या भावनेतून आसक्त, नाटक कंपनी, आजकल, थिएट्रॉन आणि नाटकघर, पुणे या संस्था आणि संस्थेशी संबंधित स्त्री-पुरुष लेखक, अभिनेते, दिग्दर्शक या कलाकारांनी एकमेकाशी संपर्क करून दोन दिवसात दीड लाख रुपयांचा निधी जमा केला आणि रंगभूमी सेवक संघ या संस्थेकडे सुपूर्द केला आहे. पुण्यातील ४१ बॅकस्टेज कलाकारांना प्रत्येकी ३ हजार ६६० रुपये जागतिक रंगभूमी दिवसाचे महत्त्व मनात ठेवून दिले जातील. या कलाकारांच्या कुटुंबाला एक महिना पुरेल इतका जीवनावश्यक शिधा  विकत घेता येईल, ही त्या मागची कल्पना आहे. ही रक्कम संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले प्रत्येक कलाकारापर्यंत पोहचवतील,' असे एका प्रयोगशील दिग्दर्शकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. 

भयप्रद शांततेने प्रत्येकाचे मन काळवंडले गेले आहे. अनेक विषाणूंचे खेळ जागतिक रंगभूमीने पाहिले आहेत आणि त्यावर पडदा टाकून नवनिर्मितीची घंटाही तिने वाजवली आहे. या आत्मविश्वासाने सध्याच्या विपरीत दृश्यात एक छोटा हातभार लावायचा म्हणून रंगभूमीवरील बॅकस्टेज कलाकारांना मदतीचा हात दिला आहे. ही मदत अल्प आहे याची जाणीव आहे. एकत्र येण्याच्या या साध्या कृतीतून सर्वांची दिसलेली एकजूट आणि रंगभूमी कलाकाराचे एकमेकांप्रति असलेले ममत्त्व हे महत्त्वाचे आहे 

-प्रयोगशील कलाकारांची भावना

टॅग्स :Theatreनाटकartकलाsocial workerसमाजसेवक